नवी दिल्ली : लॉकडाऊन (Lockdown)च्या काळात एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. स्वयंपाक घरात वापरल्या जाणाऱ्या गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे मध्यमवर्गीयांसाठी ही आनंदाची बातमी आहे. लॉकडाऊनच्या काळात ही घसरण झाल्यामुळे सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तेल कंपन्यांनी सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे.  तेल विपणन कंपन्यांनी (HPCL,BPCL, IOC) विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात कपात केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१४.२ किलोच्या विना अनुदानित एलपीजी सिलिंडरची किंमत दिल्लीमध्ये १६२.५ रुपयांनी कमी करण्यात आली आहे. सिलिंडरचे नवे दर आजपासून संपूर्ण देशात लागू करण्यात आले आहेत. इंडियन ऑईलनुसार दिल्लीत आता ग्राहकांना १४.५ किलोच्या सिलिंडरसाठी ५८१ रुपये मोजावे लागणार आहेत. तर पूर्वी ७४४ रुपये मोजावे लागत होते. 


तर आता मुंबईत सिलिंडरचे दर ७१४.५० रुपयांवरून आता ५७९ रूपयांवर आले आहेत. चेन्नईमध्ये सिलिंडरचे दर ७६१.५० रुपयांवरून ५६९.५० रुपयांवर आले आहेत. महत्त्वाचं म्हणजे कंपनीने १९ किलो असणाऱ्या सिलिंडरच्या दरात देखील कपात केली आहे. 


दिल्लीमध्ये १९ किलो एलपीजी सिलिंडर २५६ रुपयांनी स्वस्त झाला आहे. आता १ हजार २८५ रूपये सिलिंडरच्या किमतीत घसरण होवून १०२९ रूपये या नव्या दरात सिलिंडर मिळणार आहे. तर मुंबईत ९७८ आणि चेन्नईत ११४४.५० रुपयांमध्ये सिलिंडर मिळणार आहे.