Anand Mahindra Viral Video: महेंद्रा अँड महेंद्रा कंपनीचे सर्वेसर्वा आणि उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) सोशल मीडियावर नेहमी अँक्टिव असल्याचं दिसून येतं. ट्विटरच्या माध्यमातून आनंद महिंद्रा नेहमी भारतीयांची संवाद साधत असतात. निरनिराळे फोटो असो वा अनोखे व्हिडिओ, त्यांच्या सोशल मीडियावरून ते नेहमी कौतूक करताना दिसतात. अशातच आता आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडिओ (Viral Video) शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य देखील खुललं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयुष्यात आपणही आरामदायी कार घ्यावी, अशी सर्वांची अपेक्षा असते. कष्टाच्या पैश्याने गाडी घेण्याचा आनंद वेगळाच. अशातच एक व्हिडिओ आनंद महिंद्रा यांनी शेअर केला आहे. हा व्हिडिओमध्ये महिंद्रा स्कॉर्पियो-एन एसयूवी (Mahindra Scorpio-N SUV) खरेदी केल्यानंतर संपूर्ण कुटुंब आनंद साजरा करताना दिसतोय. हा व्हिडिओ आनंद महिंद्रा यांनी रिट्विट केला आणि त्यावर भाष्य करत समाधान व्यक्त केलंय.


काय म्हणाले Anand Mahindra?


भारतीय वाहन उद्योगात काम करण्याचा हा खरा पुरस्कार आणि आनंद आहे, असं आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत म्हटलं आहे. अनेकदा आनंद महिंद्रा यांनी गाडी खरेदी केल्यानंतरचे व्हिडिओ फोटो पोस्ट करताना दिसतात.


पाहा Video



उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्यासारखी सामान्य नागरिकांना आनंद महिंद्रा खूप जवळचे वाटतात. इतकी मोठी व्यक्ती आपल्याशी संवाद साधते, याचच अनेकांना आश्चर्य वाटतं. त्यामुळे त्यांच्या ट्विटची अनेकदा चर्चा होताना दिसते.


आणखी वाचा - Anand Mahindra : पठ्ठ्यानं 5 भाषेत गायलं 'केसरीया' गाणं, आनंद महिंद्राही भारावले; पाहा Video


दरम्यान, व्हिडिओमधील हे दृश्य भारतीय वाहन उद्योगाच्या अदम्य आत्म्याला मूर्त रूप देतंय, जिथं स्वप्नांना चाक मिळतात आणि नियती प्रेरणा देते. तसेच आयुष्यातील काही गोष्टी आपल्याला सर्वात जास्त महत्त्वाच्या वाटतात, अशी कमेंट आनंद महिंद्रा यांच्या ट्विटवर पहायला मिळत आहे.