Shocking News :  आता सर्व व्यवहार हे डीजिटल झाले आहेत आणि मोठ्या प्रमाणात फसवणुकीचे प्रकारही समोर येताना दिसतात. चुकून तुमच्या खात्यामध्ये काही पैसे जमा झाल्यावर खूप आनंद होतो, पैसे आपले तुमचे नसल्याने ते खर्चही करून टाकतो. अशाच प्रकारे एक जणाच्या खात्यामध्ये एक दोन लाख नाहीतर 82 कोटी जमा झाले मात्र पैसे येणं त्याच्यासाठी वाईट ठरलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकं काय आहे प्रकरण? 
ऑस्ट्रेलियामधील मेलबर्नचे रहिवासी असलेल्या थेवामनोगिरी मॅनिवेल आणि त्याची बहिणीच्या खात्यामध्ये क्रिप्टो कंपनी चुकून Crypto.com 8 हजारांच्या ऐवजी 82 कोटी पाठवते. अकाऊंटमध्ये इतकी मोठी रक्कम पाहून त्यांचा आनंद गगनात मावला नाही. इतके सारे पैसे आल्याने त्यांनी आपल्याकडील म्हणीप्रमाणे 'जीवाची मुंबई' केली. मात्र त्यांचा हा आनंद फार काही काळ टिकला नाही. 


पैसे चुकीच्या खात्यात गेल्याचं कंपनीच्या लक्षात आल्यावर कंपनीने त्यांना पैसे माघारी मागितले. कंपनीने पैसे माघारी मागितल्यावर त्या कुटंबाला मोठा धक्का बसला. पैसे जर वेळेवर परत नाही केले तर कंपनीने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं सांगितलं आहे. 


Crypto.com या कंपनीला ऑडिटच्या वेळी या गफलतीबद्दल लक्षात आलं, मात्र यामध्ये सात महिन्यांचा कालावधी गेला होता. परिवाराची चूक अशी झाली की त्यांनी या रकमेबाबत काही तपास न करता चैनबाजी करत पैसे खर्च केले. त्यामुळे तुमच्या खात्यातही अशा प्रकारे पैसे जमा झाले तर सर्वात आधी खात्री करा त्यानंतर पैशांचा वापर करा.