Sudha Murty : प्रसिद्ध लेखिका आणि समाजसेवी सुधा मूर्ती (Sudha Murty) या नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असतात. त्यांचे प्रेरणादायी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यांच्या पुस्तकांमुळे अनेकांची आयुष्य बदलली आहेत. तुम्हाला माहितच असेल की  देशातील आघाडीच्या आयटी कंपन्यांपैकी एक असलेल्या इन्फोसिसने (Infosys) 40 वर्षे पूर्ण केली आहेत. ही कंपनी सुरू करण्यासाठी सुधा मूर्ती यांनी पतीला 10 हजार रुपये कर्ज दिले होते, ज्याच्या मदतीने नारायण मूर्ती (N. R. Narayana Murthy) यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर 17.53 अब्ज रुपयांची कंपनी बनवली. इन्फोसिसला 40 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये बॉलिवूड गायिका श्रेया घोषालसह (Shreya Ghoshal) अनेक बड्या लोकांनी आपली उपस्थिती दर्शवली. विशेष बाब म्हणजे 72 वर्षीय सुधा मूर्ती या पार्टीत डान्स करताना दिसल्या. हा सुंदर व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.




इन्फोसिसला 40 वर्षे पूर्ण 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये गायिका श्रेया घोषाल, सुधा मूर्ती आणि इतर उभे आहेत. श्रेया गुरू या चित्रपटातील बरसो रे मेघा-मेघा हे गाणे गात आहे आणि सुधा  मूर्ती या अतिशय गोंडस पद्धतीने नाचत आहे. सुधा मूर्ती यांचा मनमोहक नृत्य पाहून सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहन दिले. इन्फोसिसला 40 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एका मुलाखतीत नारायण मूर्ती म्हणाले की, ते इन्फोसिसच्या उभारणीत व्यस्त असताना त्यांच्या पत्नीने बहुतेक जबाबदारी उचलली आणि घर आणि व्यवसाय दोन्ही सांभाळले. दुसरीकडे, सुधा मूर्ती या स्वत:ला एक उत्तम गुंतवणूकदार मानतात कारण त्यांनी त्यांच्या पतीला पाहून कंपनीत पहिल्यांदा 10,000 गुंतवले.



सर्वोच्च नागरी पुरस्कार


त्यांनी अलीकडेच सांगितले की त्या त्यांच्या नात्यात स्वत्व जपू देण्यावर जास्त भर देतात म्हणूनच त्यांनी कधीच एकमेकांचे मेल तपासले नाहीत. सुधा मूर्ती या व्यवसायाने भारतीय शिक्षिका आणि लेखिका आहेत. त्यांनी अनेक सामाजिक कार्यात सहभाग घेतला असून त्या इन्फोसिसच्या अध्यक्षाही आहेत. 2006 मध्ये, सुधा मूर्ती यांना चांगल्या सामाजिक कार्यासाठी सरकारचा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री (Padma Shri) देण्यात आला.