मुंबई : चाहत्यांमध्ये आपल्या आवडत्या स्टारला भेटण्याची इच्छा फार असते, आणि जर ते भेटले तर चाहत्यांचा चेहऱ्यांवरील उत्साह द्विगुणित करणारा असतो. त्यांच्यासाठी तो क्षण जणू काही आनंदाची पर्वणीच. असचं काहीसं घडलं आहे सनी देओलच्या चाहती सोबत. गुरदासपूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सनी देओल पंजाबच्या बटाला येथील रोड शो दरम्यान त्याच्या एका चाहतीने त्याला चुंबन दिले आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेता आणि आता नेता म्हणून आपले नशीब आजमावणाऱ्या सनीला एक चाहती किस करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सनी एका ट्रकवर बसून प्रचार करत आहे, त्याच दरम्यान एक महिला त्याचे चुंबन घेत असल्याचा एक व्हिडीओ भलताचं व्हायरल होत आहे. 


काही दिवसांपूर्वी सनीने एक अजब वक्तव्य केलं होतं, आपल्या बालाकोट एअर स्ट्राईकबद्दल काही कल्पना नसल्याचे सांगितलं होतं.नेहमी चित्रपटाच्या माध्यमातून देशभक्तीचे जोरजोरत डंके वाजणारा सनी देओल बलाकोट एअर स्ट्राईकबद्दल अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे.