सूरत : तुम्ही अनेकवेळा वेगवेगळ्या पद्धतीचे अन्नपदार्थ बनवणारे लोकं पाहिले असतील. परंतु कोणीही विचार करू शकणार नाही,असे ऑमलेट सूरत येथील अंडाभूर्जीवाल्याने बनवले आहे. हा पठ्ठा Fanta हे कोल्ड़्रिंक टाकून ऑमलेट बनवतो. याच्या ‘फॅन्टा फ्राई ऑमलेट’ला सूरतमध्येतर पसंती मिळतेच आहे. परंतु सोशलमीडियावरही चर्चेचा विषय बनला आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडिओ @agabaai ने शेअर केला आहे. या व्हिडिओला लाखो views आणि likes मिळाले आहेत. हजारो लोकांना हा व्हिडिओ शेअर केला आहे.  या व्हिडिओवर मजेशिर कमेंटसुद्धा येत आहेत.


 


व्हिडिओमध्ये दुकानदाराने म्हटले आहे की, ग्राहक आपल्या पसंतीच्या कोल्डड्रिंकमध्ये ऑमलेट फ्राय करण्याची ऑर्डर देतात. जसे की, लिमका, थम्सअप, फॅन्टा इत्यादी. या वेगळ्या पद्धतीच्या ऑमलेटसाठी ग्राहकांना 250 रुपये मोजावे लागतात.