अहमदाबाद: आपल्या मुलीचं प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावं असं प्रत्येक बापाला वाटत असतं त्यासाठी तो जीवतोडून प्रयत्न करत असतो. एका शेतकऱ्यांनं मुलीला पायलट बनवण्यासाठी आपल्या काळजाचा तुकडा असलेली आपली जमीन विकली आहे. गुजरातच्या सूरत इथे राहणाऱ्या शेतकऱ्याची मुलगी पायलट झाली आहे. याचा आनंद कुटुंबात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलीला पायलट बनवण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जेव्हा सरकारी बँकामध्ये लोन मिळवण्यासाठी चपला झिजवल्या. मात्र एकाही बँकेनं लोन दिलं नाही. त्यावेळी आपल्याकडे असलेली एकमेव मोलाची काळजाचा तुकडा असलेली जमीन विकली. त्यापैशातून मैत्री पटेल या आपल्या एकुलत्या एक मुलीला पायलटचं ट्रेनिंग देण्यासाठी पाठवलं. 19 व्या वर्षी पायलट होण्याचं स्वप्न तिने पूर्ण केलं. 


आपली मुलगी यशस्वीपणे पायलट झाली याचा आनंद गगनात मावेनासा होता. पण हातून जमीन गेली होती. 12 वीनंतर पायलट होण्यासाठी मैत्रीला 11 महिन्यांच ट्रेनिंग घ्यायचं होतं. त्यानंतर तिला कर्मशियल पायलटचं लायसन मिळणार होतं.


वयाच्या 8 व्या वर्षी तिने पायलट होण्याचं स्वप्न उराशी बाळगलं होतं. तिने मोठ्या कष्टानं आणि वडिलांच्या मदतीनं हे स्वप्न साकार केलं. तिला पुढे कॅप्टन व्हायचं आहे. मैत्रीला लोन मिळावं यासाठी तिच्या वडिलांनी अनेक बँकांमध्ये प्रयत्न केले मात्र कोणीच लोन द्यायला तयार नाही. त्यांना आपली जमीन विकून त्या पैशांमधून त्यांनी मैत्रीचं ट्रेनिंग पूर्ण केलं. 


अमेरिकेत विमान उड्डाणासाठी मैत्रीला लायसन मिळालं आहे. मात्र भारतात वैमानिक म्हणून तिला काम करायचं असेल तर इथल्या नियमानुसार तिला भारतातील लायसन मिळवावं लागणार आहे.