Diamond: नशीब असावं तर असं! शेतकऱ्याला सापडला 70 लाखाचा हिरा, रातोरात झाला श्रीमंत
Panna News: पन्ना जिल्हा हा हिऱ्यांची शेती (Diamond Farm) असणारा जिल्हा समजला जातो. अनेकदा या क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शेतात हिरे मिळाल्याची घटना घडली होती.
Farmer found 14 carat diamond: कधी कोणाचं नशीब चमकेल सांगता येत नाही. सर्व काही नशिबाचा (Luck) खेळ म्हणत अनेकजण नशिबाला दोष देत असतात. मात्र, हेच नशिब कधी उजाडलं तर सर्व काही चांदीच चांदी... अशातच सध्या एक बातमी (Viral News) वाऱ्यासारखी व्हायरल होत असल्याचं दिसतंय. देश आणि जगासाठी अनमोल हिऱ्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) पन्ना जिल्ह्यातील (Panna District) ही घटना आहे.
पन्ना जिल्हा हा हिऱ्यांची शेती (Diamond Farm) असणारा जिल्हा समजला जातो. अनेकदा या क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शेतात हिरे मिळाल्याची घटना घडली होती. त्याच आता पन्ना जिल्ह्यातील एका शेतकऱ्याचं (Farmer of Panna District) नशिब चमकल्याचं पहायला मिळतंय. या हिऱ्याची रक्कम ऐकून अनेकांचे डोळे उघडेच्या उघडे राहतील.
आणखी वाचा - अरे देवाला तरी घाबरा! चक्क देव्हाऱ्याखाली देशी दारूचा Stock, पोलीसही हैराण
मनोर गावचे सरपंच आणि शेतकरी प्रकाश मजुमदार (Prakash Mazumdar) यांनी त्यांच्या खाजगी क्षेत्रात खाण लावली होती. त्यात त्यांना 14.21 कॅरेटचा हिरा (Diamond ) सापडला आहे. त्यांनी हा हिरा अधिकृतरित्या सरकारी कार्यालयात जमा केला आहे. या आधी देखील त्यांना 12 हिरे मिळाले होते.
दरम्यान, हा हिऱ्याची सुमारे किंमत 70 लाख रुपये (Biggest diamond) असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. या वर्षातील हा सर्वात मोठा हिरा असल्याचं सांगितलं जातंय. 2019-20 मध्ये ज्यावेळी शेती सोडून प्रकाश मजुमदार यांनी हिऱ्याची खाण सुरू केली. त्यानंतर त्यांना 11 हिरे सापडले. त्यानंतर त्यांनी सरपंचपदाची (Sarpanch of manor village) निवडणूक लढवली आणि जिंकली सुद्धा...