नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज राज्यसभेवर चार प्रसिद्ध व्यक्तींची खासदार म्हणून नियुक्ती केली आहे. यामध्ये  शेतकरी नेते राम शकल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचारक आणि सोशल मीडियाप्रमुख लेखक राकेश सिन्हा, मूर्तीकार रघुनाथ मोहापात्रा, क्लासिकल नृत्यांगा सोनल मानसिंग यांचा सहभाग आहे.  २०१९ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने चार वेगवेगळ्या राज्यातून चार जणांची निवड केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, अनू आगा आणि अभिनेत्री रेखा यांचा कार्यकाळ संपला होता. राष्ट्रपतीनियुक्त करत असलेल्या १२ पैकी चार जागा जागा रिक्त झाल्या होत्या. त्यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज निवड केली आहे. विशेष म्हणजे चित्रपट आणि खेळाशी निगडीत असलेल्या एकाही व्यक्तीला राज्यसभेवर पाठविण्यात आलेले नाही.


यामध्ये राम शकल उत्तरप्रदेशमधील आहेत. त्यांनी दलित वर्गासाठी काम केले आहे.  राकेश सिन्हा संघ विचाराचे असून ते टिव्ही चॅनेलवर भाजपची बाजू मांडत असतात. राकेश सिन्हा दिल्ली विद्यापीठामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. सोनल मानसिंह या देशातील प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगणा आहेत. ओडिशाचे शिल्पकार रघुनाथ महापात्रा यांनी जगन्नाथ मंदिराचे महत्वपूर्ण काम केले.