मुंबई : शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची आनंदाची बातमी. कृषी मंत्रालयाने खास शेतकऱ्यांसाठी एक अॅप तयार केले आहे. या अॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लागणाऱ्या वस्तू आणि कृषी साहित्य, उपकरणे खरेदी करता येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कधीही आणि केव्हाही कृषी उपयोगी साहित्य घेणे सहज शक्य होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्र सरकारने CHC FARM MACHINERY असे या अॅपला नाव दिले आहे. या अॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लागणारी अवजारे भाड्यानेही घेता येणार आहेत. ओला-उबरच्या धर्तीवर शेतकरी या अॅपद्वारे ट्रँक्टरही भाड्याने घेऊ शकतात. यासाठी देशभरात ३५ कस्टम हायरिंक सेंटर्स उभारण्यात आली आहेत. 


यातून वर्षाला अडीच लाख कृषी उपयोगी साहित्य, साधनं आणि उपकरणं शेतकऱ्यांना भाड्यानं घेता येतील. अल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी तसंच आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांसाठी हे अॅप फायदेशीर ठरणार आहे. १२ भाषांमध्ये हे अॅप उपलब्ध आहे.