नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या हिंसक आंदोलनानंतर काँग्रेसन नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करुन महत्वाचं विधान केलंय. हिंसा हे कोणत्याही समस्येवरचं उत्तर नाही असं राहुल गांधी यांनी म्हटलंय. 'जखम कुणालाही होवो, नुकसान देशाचं होतंय असं ते म्हणाले. देशहितासाठी कृषि विरोधी कायदे रद्द करा असं देखील राहुल गांधी पुढे म्हणाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवीन कृषी कायद्यावरून दिल्लीत शेतकरी आक्रमक झालेत. आंदोलक शेतकऱ्यांकडून दिल्लीत राडा घातला जातोय. आंदोलक शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. तसंच तलवार हातात घेऊन पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्नही शेतकरी आंदोलक करतयात..शेतकऱ्यांच्या या हल्ल्यात १ पोलीस कर्मचारी जखमी झालाय. शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर अडवल्यामुळे शेतकरी संतप्त झालेत. पोलिसांवर अशा पध्दतीने हल्ला करण्यात आल्यामुळे हे आंदोलन आहे की गुंडागर्दी आहे असा प्रश्न निर्माण झालाय.



तर दुसरीकडे बाहेरून येणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांकडून दिल्लीत घुसण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. दरम्यान प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमामुळे पोलिसांकडून बॅरिकेड्स लावून आंदोलकांना रोखण्यात आलं. मात्र आंदोलकांनी बॅरिकेड्सची तोडफोड केली आहे. 



दिल्ली हरियाणा टिकरी बॉर्डरवर, कर्नाल बायपास इथं आंदोलकांनी बॅरिकेड्सची तोडफोड केलीय. तर दुसरीकडे मुकरबा चौक परिसरात पोलिसांच्या गाड्या आणि बॅरिकेड्सनं शेतकऱ्यांचा रस्ता अडवण्यात आला होता. यावेळी आंदोलकांनी पोलिसांच्या गाडीवर चढून निदर्शनं केली. तर दिल्ली मेरठ एक्स्प्रेस वे वर लावलेले बॅरिकेड् हटवत शेतकऱ्यांनी दिल्लीत प्रवेश केला आहे.