भोपाळ : शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केल्याने शेतकरी अधिक आक्रमक झालेत. बंदच्या काळात लुटीच्या घटनांत वाढ झालेय. तसेच आंदोलनामुळे रस्ता आणि रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या आंदोलनाची मध्य प्रदेशच्या मंदसौर जिल्ह्यात धग दिवसेंदिवस वाढत  जात आहे. शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी जोरदार आंदोलन सुरू आहे. मंदसौरचा प्रदेशात परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. बुधवारी पिपलियामंडीमध्ये हजारो आंदोलनकर्त्यांनी  संचारबंदी लागू असताना त्याचे उल्लंघन  केले. डीएम आणि पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केली तसेच गाड्या आणि वेअरहाऊस पेटवून दिलीत. आंदोलक एवढ्यावर न थांबता तेथील दारूची दुकानसुद्धा लुटण्यात आली. 


संतप्त आंदोलनकांनी ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या पंधरा पेक्षा जास्त लक्झरी बसेस जाळल्या, बसमधून काही जण प्रवास करत होते. या जाळपोळीनंतर स्वतःचा जीव वाचविण्यासाठी प्रवासी जवळच्या शेतात जाऊन लपले, अशी माहिती तेथील स्थानिक पत्रकारांनी दिली आहे. दरम्यान, मंगळवारी झालेल्या गोळीबारात ५ शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जातो आहे. 


मंदसौरचा दुसऱ्या भागांशी संपर्क तुटला आहे. राजकीय नेत्यांनासुद्धा मंदसौरमध्ये जाण्यापासून रोखण्यात आले आहे. मध्यप्रदेश भाजपचे प्रमुख नंदकुमार सिंह चौहान आणि कृषी मंत्री गौरीशंकर बिसेन यांना मंदसौरमध्ये जाण्यापासून रोखण्यात आलं होतं, तर काँग्रेसच्या माजी मंत्री मीनाक्षी नटराजन यांनासुद्धा सुअसरा गावात जाताना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.