नवी दिल्ली : पुलवामा येथे झालेल्या दहशदवादी हल्ल्यामध्ये 40 भारतीय जवानांना वीरमरण आले. साऱ्या देशभरातून सीआरपीएफच्या जवानांना आदरांजलीही वाहण्यात आली. त्याचप्रमाणे पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवण्याची मागणी देशभरातून होत आहे. मध्य प्रदेशच्या झाबुआ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 'जय जवान जय किसान'चा नारा बुलंद करत पाकिस्तानचा विरोध केला. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पाकिस्तानला टोमॅटो निर्यात करण्यास स्पष्ट नकार दर्शवत पाकिस्तानचा विरोध केला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक तोट्याला सामोरे जावे लागेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झाबुआ जिल्ह्यातील पेटलावद भागात मोठ्या प्रमाणात टोमॅटोची शेती केली जाते. पाकिस्तानमध्ये या टोमॅटोला प्रचंड प्रमाणात मागणी आहे. पेटलावदच्या शेतकऱ्यांचा रोजगार आणि उदारर्निवाह टोमॅटोच्या शेतीवर आधरित आहे. पण जगाच्या पोशिंद्याने त्यांच्या नफ्याला महत्त्व न देता पाकिस्तानमध्ये टोमॅटो निर्याद न करण्याचा टोकाचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील रामनगर गावात लालसिंह चौधरी नावाचा शेतकरी 25 एकर जागेवर टोमॅटोची शेती करतो. लालसिंह स्थानीक बाजारात 10 रुपये प्रती किलोने टोमॅटोची विक्री करतो तोच टोमॅटो पाकिस्तानमध्ये 40 रुपये प्रती किलोच्या भावात निर्यात केला जातो. 


संपूर्ण रामनगर भागात लालसिंह हा एकमेव शेतकरी टोमॅटोचे उत्पन्न करतो. हे टोमॅटो दिल्लीमार्गे पाकिस्तानमध्ये पाठवण्यात येतात. शेतकऱ्यांच्या सांगणयानुसार, ज्या कोणाला टोमॅटोची विक्री केली जाईल त्याने टोमॅटो पाकिस्तानत निर्यात न करण्याचे आवाहन केले आहे. शेतकरी होणारा नुकसान झेलायला तयार आहेत.