Farming Tips In Marathi: अवकाळी पाऊस आणि हवामान बदलाचा फटका शेतीवर होत आहे. अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला आहे. त्यामुळं अनेक शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीला फाटा देत आधुनिक शेतीला प्राधान्य दिले आहे. आधुनिक शेतीमुळं पिकांचे नुकसानही कमी होत आहे. त्याचबरोबर चांगला नफादेखील मिळतोय. तुम्हालादेखील कमी खर्चात भरघोस उत्पन्न कमवायचे असेल तर हे पिक शेतात घेऊ शकता. यामुळं खर्च ही कमी येतो आणि उत्पन्न अधिक येते. 


कमी खर्चात भरपूर कमाई


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कमी खर्चात बंपर कमाई करण्यासाठी शिमचा मिरचीची शेती करु शकता. कमी खर्चात शिमला मिरचीची शेती करुन शेतकरी खूप चांगले उत्पन्न मिळवत आहेत. उत्तर प्रदेशसह महाराष्ट्रातीलही काही शेतकरी त्यांच्या शेतात हा प्रयोग करुन पाहत आहेत. उत्तर प्रदेशातील मऊ जिल्ह्यातील एका प्रगतशील शेतकऱ्यांचे सर्वांसमोर आदर्श घालून दिले आहे. त्यांनी फक्त 2 हजार रुपयांत 2 एकरात मिरचीचे पिक घेतले. यातून त्यांना 70 ते 75 हजारांपर्यंतचा नफा कमावला. 


1 टन पिक घेतले 


शिमला मिरचीची शेती करण्यासाठी त्यांनी सुरुवातीला पारंपारिक पद्धतीने पाली हाऊस बनवले. त्यानंतर दिल्लीतील आशा प्रजातीच्या बिया मागवून मग शिमला मिरचीसाठी नर्सरी तयार केली. त्यानंतर सप्टेंबरच्या महिन्यात त्यांनी शिमला मिरचीच्या रोपांची पेरणी केली. यासाठी त्यांना 2000 रुपयांचा खर्च आला. त्यांनी 1 टन शिमला मिरचीचे पिक घेतले आहे. त्यांनी म्हटलं आहे की, बाजारात शिमला मिरचीचा भाव नेहमीच  वधारलेला असतो. लग्नाच्या हंगामात मागणी वाढल्याने दर देखील वाढतात.


ऑर्रेगेनिक पद्धतीने शेती 


रामलेस मौर्या यांनी म्हटलं आहे की, शिमला मिरचीची शेती त्यांनी ऑर्रेगेनिक पद्धतीने किली आहे. त्यांच्या भागाम गोमूत्र वापरुन शेती केली जाते. त्यामुळं बाजारात मिळणारी शिमला मिरची जास्त स्वादिष्ट्य असते. तुम्हीदेखील शेतीतून अधिक नफा मिळवण्याचा प्रयत्न कर असात तर पारंपारिक शेतीला जोडूनच आधुनिक शेतीलादेखील सुरू करु शकता. ज्यामुळं कमी खर्चात अधिक उत्पन्न तुम्हाला मिळू शकेल.