मुंबई : आता सगळ्या कारला टोल नाक्यावरुन जाण्यासाठी फास्टॅग अनिवार्य केले आहे. टोलवरील कर आता फक्त FASTag द्वारे आकारला जातो, ज्यासाठी तुम्हाला पैसे देण्याची गरज नाही आणि सेन्सॉरद्वारे तुमच्या बँक खात्यातून पैसे कापले जातात. आता फास्टॅगबाबत अनेक प्रकारचे नियमही बनवण्यात आले आहेत, त्याबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे. परंतु बऱ्याच लोकांना फास्टॅगच्या या नियमांचे ज्ञान नसल्यामुळे, काही समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे जर तुम्ही देखील फास्टॅग वापरत असाल तर हे नियम तुम्हाला माहित असायला हवे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1. जर तुमच्याकडे FASTag नसेल आणि तुम्ही तुमचे वाहन टोल बूथच्या FASTag लेनमध्ये ठेवले असेल, तर तुम्हाला दुप्पट टोल भरावा लागेल.


2. जर तुमचा FASTag कमी बॅलन्समुळे काम करत नसेल, किंवा तुमचा FASTag खराब झाला असेल, त्यात तुम्ही FASTag लेनमध्ये प्रवेश केला असेल, तर तुम्हाला टोल बूथवर दुप्पट रक्कम भरावी लागेल.


3. जर तुम्ही तुमच्या वाहनासाठी थर्ड पार्टी विमा घेत असाल, तर त्यासाठी फास्टॅग देखील आवश्यक आहे. पूर्वी असा कोणताही नियम नव्हता, त्यामुळे कारचा विमा काढण्यापूर्वी FASTagविषयी माहिती करुन घ्या


4. कोणताही वाहन मालक वेगवेगळ्या वाहनांसाठी समान FASTag वापरू शकत नाही. एक फास्टॅग फक्त एका वाहनासाठी आहे. जर तुमच्याकडे दोन ते चार वाहने असतील, तर तुम्हाला प्रत्येक वाहनासाठी वेगळा फास्टॅग जारी करावा लागेल.


5. जर तुम्ही एखाद्या विशिष्ट टोल प्लाझामधून सतत आणि वारंवार प्रवास करत असाल, तर तुम्हाला बँकेद्वारे FASTagसाठी मासिक पास मिळू शकतो.