मुंबई : प्रत्येक बाप-मुलाचं नातं हे खास असतं. बाप कठोर समजला जात असला तरीही त्याला आपल्या मुलांबद्दल एक वेगळी आत्मियता असते. मात्र एका बापावर अशी वेळ आलीय की, त्याला आपल्या मुलाचा मृतदेह तब्बल 17 दिवस घरातील फ्रीजरमध्ये ठेवावा लागला. हे कृत्य करणारा दुसरा तिसरा कुणी नसून त्या मुलाचा बापच आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही धक्कादायक घटना आहे यूपीच्या सुल्तानपूरमधील शिव प्रसाद पाठक यांना आपल्या मुलाचा दुसऱ्यांदा पोस्टमार्टम करायचा आहे. या उद्देशाने त्यांनी आपल्या मुलाचा शव तब्बल 17 दिवस घरातच ठेवला आहे. 


दिल्लीत झालं मुलाचं निधन 


हे प्रकरण जिल्ह्यात कुरेभार ठाणे क्षेत्रात येणाऱ्या सुबेदार पुरवा गावातील आहे. येथील निवासी शिवांक पाठक दिल्लीमध्ये आपला मित्र वरूण वर्मासोबत एक खासगी कंपनी चालवत असे. या दरम्यान त्याच कंपनी एचआर पदावर काम करणाऱ्या गुरलीन कौरसोबत शिवांकची मैत्री झाली. 2013 मध्ये दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. यानंतर या दोघांना एक मुलगी देखील झाली. 



कुटुंबात सगळं चांगल सुरू होतं. मात्र ऑगस्ट 2021 मध्ये शिवांकचा संशयास्पद मृत्यू झाला. पत्नीने दिल्लीतच शिवांकच पोस्टमार्टम केलं. एवढंच काय तर कुटुंबाला माहिती देखील दिली नाही. मृतक शिवांकचा मित्र वरूणने त्याच्या निधनाबद्दल सांगितलं तेव्हा सगळे स्तब्ध झाले. कुटुंबाला शिवांकचं निधन संशयास्पद वाटू लागलं. याबाबत त्यांनी पोलिसांत तक्रार केली. मात्र पोलिस त्यांना योग्य ती मदत न केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला. 


सूनेवर लावला हत्येचा आरोप 


यानंतर शिव प्रसाद पाठक यांनी आपल्या मुलाचा मृतदेह सुल्तानपुर घेऊन आले. त्यांची आपली सून गुरलीन कौरवरच मुलाच्या हत्येचा आरोप लावला आहे. याकरता पुन्हा एकदा पोस्टमार्टम व्हावं याची मागणी ते करत आहेत. पोलिसांनी यूपी पोलिसांची मदत न मिळाल्यामुळे न्यायालयात धाव घेतील आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर मुलाचं पुन्हा एकदा पोस्टमार्टम केलं जाणार आहे. त्यानंतरच सत्य समोर येईल.