Viral News : मुलीच्या लग्नाची संपूर्ण तयारी झाली, मंडपही सजलं, मुलीच्या हातावर मेहंदी रंगली, पण एक दिवस आधीच वडिलांची प्रेम कहाणी समोर आली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला. अखेर गावातील आणि समाजातील लोकांच्या दबावामुळे त्या व्यक्तीला आपल्या प्रेयसीबरोबर लग्न करावं लागलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलीसाठी जो मंडप सजला होता त्याच मंडपात एक दिवस आधी वडिलांचं लग्न लागलं. विशेष म्हणजे या व्यक्तीची आधी दोन लग्न झाल आहेत आणि त्याला चार मुलंही आहेत. 


नेमकी काय आहे घटना?
झारखंडमधल्या गढवा जिल्ह्यातल्या दांडई पोलीस स्टेशन परिसरातील ही घटना आहे. लवाही कला गावात राहणारा 56 वर्षीय शिवप्रसाद वैद्य हा गावातीलच एका मुलीची शिकवणी घ्यायचा. याच दरम्यान त्या मुलीशी त्याचे प्रेमसंबंध जुळले. पण प्रकरण इथंच संपलं नाही. तीन वर्षांपूर्वी एके दिवशी मुलगी घरातून बेपत्ता झाली. शिक्षक शिवप्रसाद वैद्य यांच्यावर संशय व्यक्त करत त्या मुलीच्या वडिलांनी स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार केली. मात्र त्यावेळी पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही.


तीन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या मुलीचे कुटुंब हतबल झालं. दोन दिवसांपूर्वी अचानक त्या मुलीच्या कुटुंबियांना माहिती मिळाली की ती मुलगी छत्तीसगडमधल्या एका गावात आहे. शिवप्रसाद वैद्य याने तिला तिथे भाड्याच्या घरात ठेवलं होतं. मुलीच्या कुटुंबीयांनी गावातील लोकांना आणि समाजाला याची माहिती दिली. पोलिसांनाही कळवण्यात आलं. पोलिसांनी शिवप्रसाद वैद्य यांना बोलावून चौकशी केली. अखेर त्यानं सर्व कबूल केलं.


ती मुलगी एका मुलाची आई बनली आहे. त्या मुलीचा शोध लागल्यानंतर तिला छत्तीसगड इथून आणण्यात आलं. त्यानंतर दोघांचा विवाह पार पडला, यावेळी पोलिसांसह गावातील आणि समाजातील शेकडो लोक उपस्थित होते. विशेष म्हणजे दुसऱ्या दिवशी शिवप्रसाद वैद्य याच्या मुलीचं ठरलेलं लग्नही थाटात पार पडलं.