३०जूनच्या मध्यरात्री जन्मलेल्या मुलीचे नाव ठेवले जीएसटी
३०जूनच्या रात्री संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये जीएसटी शानदार लाँचिंग सोहळा पार पडला. देशभरात जीएसटी लागू झाला.
पाली : ३०जूनच्या रात्री संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये जीएसटी शानदार लाँचिंग सोहळा पार पडला. देशभरात जीएसटी लागू झाला.
याचदरम्यान राजस्थानच्या पाली जिल्ह्यात एका चिमुकल्या परीचा जन्म झाला. देशात जीएसटी लागू झाल्याची घोषणा झाली या मुलीच्या पित्याने आपल्या मुलीचे नावही जीएसटी असेच ठेवले.
शहरातील महालक्ष्मी गल्लीमध्ये राहणाऱे जसराज यांच्या पत्नीला ३०जूनला प्रसुती कळा सुरु झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री १२ वाजून २ मिनिटांनी जसराज यांच्या पत्नीने जुळ्या मुलांना जन्म दिला. यात एक मुलगी तर दुसरा मुलगा होता.
एकीकडे देशभरात जीएसटी लागू झाल्याचा उत्साह होता. त्यामुळे आनंदित झालेल्या या पित्याने आपल्या मुलीचेच नाव जीएसटी ठेवले. दरम्यान, घरात हाक मारण्यासाठी जीएसटी हे नाव असेल आणि तिच्या जन्मवेळेनुसार दुसरे नाव ठेवले जाईल असे जसराज यांनी यावेळी सांगितले.