नवी दिल्ली: मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा यांना भाजपने भोपाळ मतदारसंघातून उमेदवारी दिल्यानंतर त्याचे राजकीय आणि सामाजिक पडसाद उमटत आहेत. या निर्णयावर विरोधकांनी कालपासूनच टीका करायला सुरुवात केली होती. मात्र, आता मालेगाव बॉ़म्बस्फोटातील एका मृताच्या वडिलांनी साध्वी प्रज्ञा यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला आहे. या मृताच्या वडिलांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या ( एनआयए) विशेष न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामध्ये साध्वी प्रज्ञा या निवडणुकीला कशा उभ्या राहू शकतात, असा सवाल विचारण्यात आला आहे. साध्वी प्रज्ञा यांनी प्रकृतीच्या कारणास्तव जामिनासाठी अर्ज केला होता. विशेष न्यायालयाने ही मागणी मान्य करत साध्वी प्रज्ञा यांची जामिनावर सुटका केली होती. मात्र, आता पीडिताच्या वडिलांनी उपस्थित केलेल्या आक्षेपाविषयी न्यायालय काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मी संशयित दहशतवाद्याला उमेदवारी दिली तर चालेल का? मेहबुबा मुफ्तींचा भाजपला सवाल


तत्पूर्वी  काश्मीरचे माजी मुख्यमंत्री व नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुला यांनीही साध्वी प्रज्ञा यांना भोपाळमधून उमेदवारी दिल्याबद्दल संताप व्यक्त केला. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांची तब्येत ठीक झाली असेल तर त्यांना परत तुरुंगात पाठवले पाहिजे. भोपाळ मतदार संघातून भाजपाने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे. यापेक्षा भाजपाचे मोठे दुर्दैव काय असू शकते, असा सवाल त्यांनी विचारला होता.