मुंबई : FD Rate Hikes: RBIने रेपो दरात वाढ केल्यानंतर विविध बँकांमधील एफडीवरील (FD) व्याजदरात वाढ केली आहे. खासगी ते सरकारी बँकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफडीच्या व्याजदरात वाढ केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI)गेल्या दोन महिन्यांत रेपो दरात तिन वेळा ही वाढ केली आहे. यानंतर बँकांमध्ये बचत योजनांवरील व्याजदर वाढवण्याची स्पर्धा लागली आहे. रेपो दरात वाढ केल्यानंतर विविध बँकांमधील एफडीवरील व्याजदर वाढत आहेत. खासगी ते सरकारी बँकांकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफडीच्या व्याजदरात वाढ होत आहे. 


चार मोठ्या बँकांनी एकाच दिवसात FDचे व्याजदर वाढवण्याची घोषणा केल्याने वेगवेगळ्या तारखांपासून लागू करण्यात आलेली वाढ ग्राहकांसाठी अधिक चांदीची ठरली. मात्र, व्याजदरातील ही वाढ वेगवेगळ्या तारखांपासून लागू झाली आहे. ज्या बँकांनी व्याजदरात बदल केला आहे, त्यात आयडीएफसी फर्स्ट बँक, एचडीएफसी बँक, पंजाब नॅशनल बँक आणि कोटक महिंद्रा बँक यांचा समावेश आहे.


HDFC बँक


देशातील सर्वात मोठी खाजगी बँक HDFC ने पुन्हा एकदा व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने एफडी दरात 40 बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे. दोन महिन्यांपूर्वीही बँकेने एफडीवरील व्याजात वाढ केली होती. बँकेने 18 ऑगस्ट 2022 पासून नवीन दर लागू केले आहेत. बँकेने केवळ 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवरच व्याज वाढवले ​​आहे. आता एक वर्ष ते दोन वर्षांच्या मुदतीच्या FD वर 5.50 टक्के व्याज मिळेल.


पंजाब नॅशनल बँक


पंजाब नॅशनल बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवरील व्याजदरातही वाढ केली आहे. बँकेचे नवे दर 17 ऑगस्टपासून लागू झाले आहेत. बँकेने जारी केलेल्या निवेदनानुसार, एक वर्षापासून तीन वर्षांपर्यंत आणि 5 वर्षे किंवा त्याहून अधिक मुदतीच्या मुदतीसह एफडीचा दर वाढवण्यात आला आहे. 10 वर्षांपर्यंतच्या एफडीच्या दरातही वाढ करण्यात आली आहे.


आयडीएफसी बँक


इतर बँकांप्रमाणेच, आयडीएफसी बँकेनेही 2 कोटींपेक्षा कमी एफडीवरील व्याजात वाढ केली आहे. नवीन दर 16 ऑगस्टपासून लागू करण्यात आले आहेत. IDFC बँकेत, 2 वर्ष 1 दिवस ते 749 दिवसांच्या मुदतीच्या FD वर 6.50 टक्के व्याज मिळेल. त्याच वेळी, 750 दिवसांत परिपक्व होणाऱ्या एफडीवर 6.90 टक्के व्याज आहे. बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के अतिरिक्त व्याज दिले जाते.


कोटक महिंद्रा बँक


कोटक महिंद्रा बँकेने एफडीवरील व्याजदर 390 दिवसांवरुन 3 वर्षांपर्यंत वाढवला आहे. बँकेच्या म्हणण्यानुसार नवीन दर 17 ऑगस्टपासून लागू होतील. बँकेने व्याजदर वाढीमध्ये 390 दिवसांपासून ते तीन वर्षांपर्यंतच्या एफडीचा समावेश केला आहे. बँकेने 7 दिवस ते 10 वर्षांच्या मुदतीच्या FD साठी 2.50 ते 5.90 टक्के व्याज जाहीर केले आहे. ज्येष्ठ नागरिकांना 3 ते 6.40 टक्के व्याज मिळेल.