FD Rates Hike: बॅंक खातेधारकांसाठी मोठी बातमी! `या` दोन बॅंकानी वाढवले FD Rates
FD Rates Hike: युनियन बँक ऑफ इंडियाने आजपासून आपल्या मुदत ठेवींच्या व्याजदरात सुधारणा केली आहे. बँक आता सर्वसामान्यांसाठी 7.3 टक्के परतावा देणार आहे तर ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त व्याजदर द्यावा लागतो त्याप्रमाणे हे दर 7.8 टक्के असे झाले आहेत.
FD Rates Hike: आपल्या चांगल्या भविष्यासाठी आपण नेहमीच फायनॅन्शियल प्लॅनिंग करायचा प्रयत्न करतो. मग त्यात शेअर बाजार असेल वा म्युच्यूअल फंड. त्यातून बॅंकही आपल्या खातेधारकांना चांगले इंटरेस्ट रेट देते. सेव्हिंग्ससाठी आपण चांगला मार्ग बघतो तो म्हणजे मुदत ठेवीचा. यावरील मिळणाऱ्या व्याजदारातून आपल्याला मुदत ठेवीचा काळ पुर्ण झाल्यावर तुम्हाला यातून चांगली रक्कम मिळते. सध्या याच संदर्भात एक मोठा निर्णय दोन बॅंकांनी घेतला आहे. आरबीएल आणि युनियन बँक ऑफ इंडिया अशी त्या दोन बँकांची नावे आहेत. (fd rates hike union bank of india and rbl bank increases interest rates by 7.8 percent)
युनियन बँक ऑफ इंडियाने आजपासून आपल्या मुदत ठेवींच्या व्याजदरात सुधारणा केली आहे. बँक आता सर्वसामान्यांसाठी 7.3 टक्के परतावा देणार आहे तर ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त व्याजदर द्यावा लागतो त्याप्रमाणे हे दर 7.8 टक्के असे झाले आहेत. युनियन बँक ऑफ इंडियाचे फिक्स डिपॉझिटचे व्याजदर 3 टक्क्यांपासून सुरू होतात आणि कालावधीनुसार 7.3 टक्क्यांपर्यंत जातात. युनियन बँक आता सात दिवस ते 45 दिवसांच्या मुदत ठेवींसाठी 3 टक्के, 46-90 दिवसांच्या मुदतीसह एफडीसाठी 4.05 टक्के, 91-120 दिवसांच्या कालावधीसाठी 4.3 टक्के, 4.4 टक्के परतावा देते. 121-180 दिवसांचा कार्यकाळ आणि 181 दिवस ते एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी 5.25 टक्के अशी रचना करण्यात आली आहे. एक वर्ष ते 799 दिवसांच्या मुदत ठेवींवर (599 दिवस आणि 700 दिवस वगळता) 6.3 टक्के परतावा मिळेल तर 599 दिवसांसाठी 7 टक्के व्याज मिळेल आणि 700 दिवसांसाठी 7.25 टक्के परतावा मिळेल तर 800 दिवसांच्या एफडीवर 7.30 टक्के, 801 दिवस ते 3 वर्षांपर्यंतच्या एफडीवर 6.30 टक्के, 3 वर्षांपर्यंतच्या एफडीवर 7.30 टक्के, 3 ते 5 वर्षांपर्यंतच्या एफडीवर बँक ऑफर करत आहे. FD वर 6.70 टक्के व्याजदर आणि 5 ते 10 वर्षांच्या FD वर सामान्य ग्राहकांना 6.70 टक्के व्याजदर आहेत.
हेही वाचा - पत्नीकडे पाहू नको बोलल्याचा राग मनात धरत तो थेट घरात शिरला अन्... थराराक घटना
महागाईला तोंड देण्यासाठी -
देशातील महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) सातत्याने व्याजदरात वाढ करत आहे. अशा स्थितीत त्याचा थेट परिणाम बँकेच्या व्याजदरांवर होत आहे. यासोबतच बँका त्यांच्या कर्जाच्या व्याजदरात सातत्याने वाढ करत आहेत. अलीकडेच दोन बँकांनी त्यांच्या 2 कोटींपेक्षा कमी ठेवींवरील व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. युनियन बँक ऑफ इंडिया आणि आरबीएल बँकांचे नवीन व्याजदर 25 नोव्हेंबर 2022 पासून म्हणजेच शुक्रवारपासून लागू झाले आहेत. या बँका त्यांच्या सामान्य ग्राहकांना एफडी योजनेवर कमाल 7.55 टक्के व्याजदर देत आहेत.
RBL बँकेचे नवीन FD दर -
RBL बँकनं (RBL Bank FD Rates) सामान्य नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षांपर्यंतच्या FD वर 3.25 टक्के ते 6.55 टक्के व्याजदर देत आहे. 725 दिवसांच्या एफडीवर 7.55 टक्के कमाल व्याजदर दिला जात आहे. बँक 7 दिवस ते 14 दिवसांच्या एफडीवर 3.25 टक्के व्याजदर देत आहे. 15 दिवसांपासून ते 45 दिवसांपर्यंतच्या FD वर 3.75 टक्के व्याजदर, 46 ते 90 दिवसांच्या FD वर 4.00 टक्के व्याज देत आहे. 181 दिवस ते 240 दिवसांच्या एफडीवर 5.00 टक्के, 241 ते 364 दिवसांच्या एफडीवर 5.85 टक्के, 365 दिवस ते 452 दिवसांच्या एफडीवर 7.00 टक्के, बँक 15 दिवसांच्या एफडीवर 7.55 टक्के व्याजदर देत आहे. 726 दिवस ते 36 महिन्यांपर्यंतच्या एफडीवर 7.00 टक्के, 36 महिने ते 60 महिन्यांपर्यंतच्या एफडीवर 6.55 टक्के, 60 महिने ते 240 महिन्यांपर्यंतच्या एफडीवर 6.25 टक्के आणि करावर 6.55 टक्के व्याजदर देते.