मला इथे असुरक्षित वाटतेय- मोहम्मद शमी
परदेशदौऱ्यात मला व माझ्या कुटुंबीयांना सुरक्षित असल्याचे जाणवते. मी राहतो त्या कोलकाता शहरात मात्र सतत असुरक्षित वाटत असल्याचे शमी म्हणाला.
कोलकाता : भारताचा स्टार वेगवान गोलंदाज याने आपण राहत असलेल्या ठिकाणी असुरक्षित असल्याची भावना व्यक्त केली आहे.
त्याच्या या विधानामुळे खळबळ उडाली आहे. गेल्या महिन्यात स्थानिक सलूनचालकांनी त्याला व त्याच्या कुटुंबीयांना दिलेल्या धमक्यांमुळे शमी अस्वस्थ आहे. एका महिन्याच्या दौर्यानंतर तो पुन्हा आपल्या मायदेशी परतला आहे.
परदेशदौऱ्यात मला व माझ्या कुटुंबीयांना सुरक्षित असल्याचे जाणवते. मी राहतो त्या कोलकाता शहरात मात्र सतत असुरक्षित वाटत असल्याचे विधान त्याने केले आहे.
मोहम्मद शमी आपली पत्नी, मुलगी व अन्य कुटुंबीयांसह कोलकाता शहरातील साऊथ सिटी मॉलजवळील इमारतीत गेली ५ वर्षे राहतो.
गेल्या महिन्यात या विभागातील शिवा प्रामाणिक (३२), सलूनमालक स्वरूप सरकार (३४) आणि जयंत सरकार (३९) यांनी शमी याच्या कुटुंबाला गंभीर धमक्या दिल्या होत्या.
शिवाय मॉलमधून घरी परतल्यावर शमीच्या कारच्या काचांवर थापा मारत त्याच्याशी वादही घातला होता. या घटनेनंतर शमीच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
त्या या घडलेल्या प्रकाराची तक्रार स्थानिक पोलिसात केली. पण धमक्या देणारे 'सरकार बंधू' अटकेनंतर आता जामिनावर सुटले आहेत. त्यामुळे शमी स्वत: आणि कुटुंबाला असुरक्षित मानत आहे.
पोलिसांनी माझ्या तक्रारीनंतर योग्य कारवाई केली, पण त्यानंतर माझ्या व कुटुंबाच्या सुरक्षेबाबत साधी चौकशी करण्याचे सौजन्यही स्थानिक प्रशासनाने दाखवले नाही. मग आम्ही स्वतःला सुरक्षित कसे मानायचे?