Fighter Mother : तुमच्या पैकी अनेकांनी KGF सिनेमा पाहिला असेल. KGF मधला प्रत्येक संवाद शिट्ट्या आणि टाळ्या घेवून जातो. KGF मधला एक संवाद आहे. जो खूप प्रसिद्ध आहे. या संवादावर अनेक रिल्स बनल्या आहेत. तो संवाद आहे "दुनिया का सबसे बडा योद्धा मां होती है" हा संवाद जरी सिनेमात असला तरी तो प्रत्येक्षात अनुभवायला मिळाला आहे. तसा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एक आई आपल्या मुलाला पाठीवर बांधून भर उन्हात झाडू मारत आहे. 


कुठला आहे हा व्हिडीओ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडीओ ओडिसातला आहे. या व्हिडीओतील महिला एक सफाई कर्मचारी आहे. 
या महिलेचं नाव लक्ष्मी मुखी (Laxmee Mukhi) आहे. ती आपल्या लेकराला घेऊन रोज कामावर येते. लक्ष्मी म्हणतात," गेल्या 10 वर्षांपासून बारीपाडा इथल्या नगरपालिकेत मी सफाई कर्मचारी म्हणून काम करते. माझ्या घरी मी एकटी आहे. त्यामुळं माझ्या या लहान मुलाची काळजी घेणारं घरी कुणीच नाही. त्यामुळं या लहान बाळाला घरी एकटं सोडता येत नाही. म्हणून मी बाळाला पाठिवर बांधते आणि माझं कर्तव्य पार पाडत असते."



बारीपाडा नगरपालिकेचे अध्यक्ष बांदल मोहंती (Bandal Mohanti) म्हणतात, "लक्ष्मी मुखी ही स्वच्छता कर्मचारी आहे. घरगुती कारणांमुळे ती मुलाला घेऊन कामावर येते. ती उत्तम काम करते. तक्रार करण्याची संधी देत नाही. तिला कोणतीही अडचण आली तर आम्ही तिच्या पाठिशी असतो" 


लक्ष्मीनं अनेकांना धडा दिलाय. आपलं कर्तव्य सांभाळत ती आमल्या मुलाचं संगोपन करते. खरचं 'दुनिया का सबसे बडा योद्धा मां होती है'