Social Media Viral Video: सोशल मीडियावरील रिल्स शूट करणे व रिल्समधून मिळणाऱ्या लोकप्रियतेमुळं अनेक जण रिल्ससाठी काहीही करायला तयार होतात. फॉलोअर्सची संख्या वाढवण्यासाठी व रिल्सला जास्तीत जास्त लाइक्स मिळवण्यासाठी हद्द पार करतात. कधीकधी सोशल मीडियामुळं अनेकजण जीवही गमावून बसतात. अशातच एका शिक्षिकेने फेमस होण्यासाठी आणि फॉलोवर्स वाढवण्यासाठी असं काही केलं की त्याने सगळेच हादरले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशमधल्या इटावा येथे हा प्रकार घडला आहे. महिला टिचरने अश्लील व्हिडिओ बनवून इन्स्टाग्रामवर शेअर केला आणि बघता बघता तिचा हा व्हिडिओ खूपच व्हायरल झाला. ज्या शाळेत महिला शिक्षक शिकवते तिथल्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला. विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यावर आक्षेप नोंदवला आहे तसंच, शिक्षिकेला शाळेतून काढण्याचीही मागणी केली आहे. 


महिला शिक्षिकेला रील्स बनवण्याची आवड होती. इन्स्टाग्रामवर फॉलोवर्स वाढवण्यासाठी ती अनेक व्हिडिओदेखील बनवत होती. फॉलोवर्स वाढवण्याच्या प्रयत्नात तीने स्वतःचाच अश्लील व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमुळं तिचे फॉलोवर्स वाढतील, असं तिला वाटलं मात्र याउलटच घडलं. शिक्षेकेचे रिल व्हायरल होताच विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी यावर तीव्र आक्षेप नोंदवला. महिला एका प्राथमिक शाळेत शिकवत होती. 


ग्रामस्थांनी केलेल्या आरोपांनुसार, ज्या शाळेत आमची मुलं शिकतात त्याच शाळेतील महिला शिक्षिकेचे कृत्य पाहून त्याच्या वर्तवणुकीवर काय परिणाम होईल? त्यामुळं या शिक्षेकेला शाळेतून काढून टाकावे, अशी मागणी करण्यात येत आहे. 


दरम्यान, या व्हिडिओसंदर्भात जिल्हा शिक्षण अधिकारी राजेश कुमार यांच्याशी संपर्क साधला असता त्याने व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लगेचच चौकशी करुन त्यावर करवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र या घटनेवरुन एकच खळबळ उडाली आहे. तर, शिक्षेकेला शाळेतून काढून टाकावे, अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली आहे. यावर आता काय कारवाई करण्यात येते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.