Crime news : आई वडिलांनंतर शिक्षक हा आपला गुरु असतो. त्याला आपल्या आयुष्यात मोलाचं स्थान असतं. पण याच शिक्षकाच्या पेशाला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका प्रसिद्ध शाळेतील शिक्षिकेचा कारनामा पाहून संतापाची लाट उसळली आहे. या शिक्षिकेचं दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर प्रेम झालं. एवढंच नाही तर त्याला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे याच शाळेत त्या महिला शिक्षिकेचा पती आणि भाऊ देखील नोकरी करतात. (female Teachers love for 10th class student to have physical relationship with her up Kanpur Crime news)


शिक्षिकेचा प्रपात असा झाला उघड 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीडित मुलाच्या वडिलांना एकदा त्याच्या मोबाईलमध्ये शिक्षिकेचे काही मेसेज दिसले. ते मेसेज पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या शिक्षिकेने शारीरिक संबंध ठेवण्यासाठी मुलीला अश्लील मेसेज पाठवले होते. त्याशिवाय त्यांच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकण्यात येतं असल्याचंही त्या त्यांना समजलं. ही शिक्षिका रात्रभर मुलाशी फोनवर गप्पा मारत होती. 


मोबाईलमधील हे संभाषण वाचून वडिलांनी शिक्षिकेविरोधात पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी शिक्षिका आणि त्याचा पती, भावाविरोधात तक्रार दाखल केली आहे. हे तिघेही त्यांच्या मुलावर धर्मांतर करण्यासाठी दाबव टाकत असल्याचा आरोप मुलाच्या वडिलांनी केला आहे. 


मुलगा आणि शिक्षिका यांच्यामधील चॅटिंगचे स्क्रीन शॉट्स वडिलांनी पोलिसांना दिले आहे. पण त्यात धर्मांतर करण्यासाठीचा कुठलाही पुरावा वडिलांनी दिला नाही. त्यावर वडिलांनी पोलिसांना सांगितलं की, मुलाने अनेक चॅट डिलीट केले आहेत. 


कुठे घडली घटना?


दरम्यान पोलीस या प्रकरणाची चौकशी करत असून या प्रकरणाचे तथ्य ते शोधून काढत आहेत. सबळ पुरावे मिळाल्यावर तिघांवर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन पोलिसांनी मुलाच्या वडिलांना दिलं आहे. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील कानपूरमधील आहे.