मुंबई : येत्या सणासुदीच्या दिवसांमध्ये ऑटो सेक्टरची तेजी दिसून येऊ शकते. मागील काही महिन्यांपासून सेमीकंडक्टर चिपच्या टंचाईमुळे ऑटो सेक्टरवर परिणाम झाला होता. तरी सुद्धा येत्या दिवसात या सेक्टरमध्ये तेजीची शक्यता आहे. सणांच्या दरम्यान वाहन खरेदीकडे भारतीयांचा कल असतो. ज्यामुळे या सेक्टरला बुस्ट मिळू शकतो.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्रोकरेज हाऊस मोतिलाल ओस्वाल
ब्रोकरेज हाऊस मोतिलाल ओस्वाल यांचे म्हणणे आहे की, सप्टेंबर महिन्याचा 2 व्हिलर आणि कमर्शिअल वाहनांच्या विक्रीचा डेटा अपेक्षेनुसारच राहिला आहे. खासगी वाहने आणि 3 व्हिलर सेगमेंटमध्ये घसरण दिसून आली.तसेच  ट्रॅक्टरची देखील विक्री अपेक्षेनुसारच राहिली आहे. सप्टेंबरमध्ये सप्लाय चैन बाधित झाली होती. परंतु ऑक्टोबरच्या सुरूवातीपासून सेक्टरमध्ये पुन्हा उत्साहाचे वातावरण आहे.


ब्रोकरेज हाऊस ICICI डायरेक्ट
सप्टेंबरमधील तिमाहीमध्ये होलसेल डाटा संमिश्र राहिला आहे. महिन्याच्या आधारावर पाहिल्यास 2 व्हिलर आणि थ्री व्हिलर सेंग्मेंटमध्ये डबल डिजिटने वाढ झाली आहे. येत्या दिवसात यात आणखी ग्रोथ दिसून येईल.


ब्रोकरेज हाऊस एमके ग्लोबल फायनान्शिअल सर्विसेस
ब्रोकरेज हाऊसच्या रिपोर्टनुसार सप्टेंबरमध्ये सेल्स डाटा अपेक्षेनुसार राहिला आहे. कमर्शिअल वाहनांच्या सेंग्मेंटमध्ये चांगली प्रगती दिसून आली आहे. आता चिपच्या सप्लायमध्ये सुधारणा होत आहे. सणांच्या दिवसांमध्ये मागणी वाढायला सुरू होईल. अशातच येणाऱ्या दिवसांमध्ये ऑटो सेक्टरमध्ये चांगले परिणाम दिसून येतील.


टॉप पिक्स : 
Tata Motors, Ashok leyland, Maruti Suzuki, TVS Motors, Motherson Sumi system, Bharat Forge, Apollo Tyres


(Disclaimer : येथे शेअर्समध्ये गुंतवणूकीचा सल्ला ब्रोकरेज हाऊसकडून देण्यात आलेला आहे.  बाजाराच्या जोखिमेनुसार गुंतवणूकीआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. )