मुंबई :  सणासुदीच्या आधी शेअर बाजारात गुंतवणूकीसाठी अनेक संधी निर्माण होत आहेत. दसरा दिवाळीच्या दरम्यान ग्राहकांचा खरेदीकडे कल असतो. ब्रोकरेज हाऊस ICICI सेक्युरिटीजने काही शेअर्समध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. विशेष बाब म्हणजे मागील वर्षभरात या शेअर्सने 110 टक्क्यांपर्यंत रिटर्न दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

TRENT LTD
ब्रोकरेज हाऊस ICICI सेक्युरिटीजने ट्रेंट लिमिटेडच्या शेअर्सची 1160 रुपयांचे टार्गेट ठेऊन खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. 1 ऑक्टोबरला शेअरचा भाव 1039.95 रुपये इतका होता. सध्याच्या लेवलवर खरेदी केल्यास 100 ते 120 रुपयांचा फायदा होऊ शकतो.


Aditya Birla Fashion and Retail Ltd
ब्रोकरेज हाऊस ICICI सेक्युरिटीजने अदित्य बिरला फॅशनच्या शेअर्समध्ये खरेदीचा सल्ला दिला आहे. यासाठी 243.30 रुपयांचे टार्गेट दिले आहे. मागील एका वर्षात या कंपनीने चांगला रिटर्न दिला आहे.


V-Mart Retail Ltd
ब्रोकरेज हाऊसने वी मार्ट रिटेलमध्ये 4170 रुपयांचा टार्गे ठेऊन खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. 1 ऑक्टोबरला या शेअरचा भाव 3658 रुपये होता.  मागील वर्षभरात या शेअरने 85 टक्क्यांचा रिटर्न दिला आहे.


TCNS Clothing Co Ltd
ब्रोकरेज हाऊसने टिसीएनएस क्लोदिंगमध्ये 725 च्या टार्गेटसह खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. 1 ऑक्टोबरला या शेअरचा भाव 650 रुपये होता.  मागील वर्षभरात या शेअरने गुंतवणूकदारांना 65 टक्क्यांचा रिटर्न दिला आहे.


Arvind Fashions Ltd
या शेअरमध्ये 310 रुपयांच्या टार्गेटसह खरेदीचा सल्ला देण्यात आला आहे. 1 ऑक्टोबर रोजी या शेअरचा दर 270 रुपये इतका होता. या शेअरने मागील वर्षभरात 110.47 टक्क्यांचा रिटर्न दिला आहे.