Wife Killed Husband: मध्य प्रदेशमधील (Madhya Pradesh) सिंगरौली जिल्ह्यातील उर्ती गावामधील एका व्यक्तीच्या हत्या प्रकरणामध्ये (Crime News) पोलिसांनी मृत व्यक्तीच्या पत्नीलाच अटक केली आहे. या महिलेनेच आपल्या पतीची हत्या केल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागल्यानंतर ही अटकेची कारवाई करण्यात आली. बीरेंद्र गुर्जर असं मृत व्यक्तीचं नाव असून 21 फेब्रुवारी रोजी बीरेंद्रचा मृतदेह आढळून आलं होतं. मृत व्यक्तीच्या मृतदेहाच्या गळ्याजवळ आणि गुप्तांगाजवळ जखमांच्या खूणा दिसत होत्या.


पत्नीनेच दाखल केली तक्रार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलीस स्थानकातील प्रमुख अरुण पांडये यांनी दिलेल्या माहितीनुसार बीरेंद्रची पत्नी कांचन गुर्जरनेच पोलीस स्थानकामध्ये पती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. अज्ञात व्यक्तीविरोधात कांचनने तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. तपासादरम्यान पोलिसांनी मृत बीरेंद्रचे जवळचे नातेवाईक आणि मित्रांची चौकशी केली. ज्यांच्यावर पोलिसांना संक्षय आला त्या सर्वांची चौकशी करण्यात आली. अगदी सखोल चौकशी आणि नोंदींच्या आधारे पोलीस तपास करत असतानाच ब्रीरेंद्रची पत्नी कांचनसंदर्भात सुद्धा पोलिसांनी शंका उपस्थित केली. त्यांनी कांचनला चौकशीसाठी बोलावलं.


...अन् तिने कबुल केला गुन्हा


कांचनला आधी घटनाक्रम विचारण्यात आला असता तिने काय काय घडलं हे सांगितलं. मात्र तरीही पोलिसांचं तिच्या उत्तरांनी समाधान झालं आहे. त्यामुळे त्यांनी पोलिसी खाक्या दाखवत कांचनची चौकशी केली असता तिने आपला गुन्हा कबूल केला आणि नेमकं काय काय घडलं यासंदर्भातील खरा घटनाक्रम सांगितला. ब्रीरेंद्र हा रोज नशा करुन घरी यायचा. त्याला नशा करण्याची सवय लागली होती. तो नशेत घरी आल्यानंतर माझा छळ करायचा असं कांचचने पोलिसांना सांगितलं.


गुप्तांगावर वार


पतीच्या रोजच्या जाचाला कंटाळून कांचनने पतीला ठार मारण्याची योजना तयार केली. कांचनने 21 फेब्रुवारी रोजी आपल्या पतीच्या जेवणामध्ये झोपेच्या 20 गोळ्या मिसळल्या. पतीला गोळ्यांमुळे झोप लागल्यानंतर या महिलेने ठरवल्याप्रमाणे त्याला संपवलं. कांचचने कुऱ्हाडीने अनेकदा पतीच्या गळ्यावर वार केले. त्यानंतर कांचनने धारधार शस्त्राने पतीच्या गुप्तांगावर वार केले. गुप्तांगाजवळचा एकामागोमाग एक अनेकदा वार केल्याने अती रक्तस्त्राव झाल्याने बीरेंद्रचा मृत्यू झाला. 


पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न


पतीची हत्या केल्यानंतर कांचनने त्याचा मृतदेह कपड्यात गुंडळून रस्त्याच्याकडेला फेकून दिला. कांचनने पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने ब्रीरेंद्रचे कपडे आणि चप्पलाही जाळल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कांचन ही ब्रीरेंद्रची पाचवी पत्नी होती. यापूर्वी ब्रीरेंद्रच्या 4 पत्नींनी त्याला सोडलं होतं. ब्रीरेंद्रकडून वारंवार होणाऱ्या मारहाणीला कंटाळून या महिला घर सोडून पळून गेल्या. अशाच छळाला कंटाळून कांचनने ब्रीरेंद्रची हत्या केली.