नागरी कायद्याला विरोध; संगीतकार अरिबम श्याम शर्मांकडून पद्मश्री परत
२००६ साली देण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार परत केला
नवी दिल्ली - मणिपूरचे प्रख्यात चित्रपट निर्माते आणि संगीतकार अरिबम श्याम शर्मा यांनी त्यांना २००६ साली देण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार परत केला आहे. रविवारी इंफाळमध्ये त्यांनी पुरस्कार परत करत असल्याची घोषणा केली. २०१६ च्या वादग्रस्त नागरिकत्व कायद्याचा विरोध करत त्यांनी पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेत असल्याचे सांगितले.
'८२ वर्षीय अरिबम श्याम शर्मा यांनी मणिपूरवासियांना सुरक्षेची गरज आहे. ५०० हून अधिक सदस्य असणाऱ्या लोकसभेत राज्यातील केवळ एक-दोन सदस्य आहेत. अशा परिस्थितीत संसदेत देशाच्या उत्तर-पूर्व भागाचा आवाज कसा येईल' असा सवाल त्यांनी केला आहे.