देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन (nirmala sitharaman) यांचा एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन भाजी (vegetable) खरेदी करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ तामिळनाडूतील चेन्नईच्या (chennai) मैलापूर मार्केटमधील आहे. शनिवारी अर्थमंत्र्यांनी अचानक मार्केटच्या गाठून भाजीपाला (vegetable market) खरेदीला सुरुवात केली. भाजी खरेदीसोबतच त्यांनी भाजी विक्रेते आणि स्थानिक लोकांशीही संवाद साधला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजी मंडईत (vegetable market) पोहोचल्यानंतर खरेदीचा व्हिडिओ अर्थमंत्र्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून प्रसिद्ध करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये अर्थमंत्री रताळे आणि कारले खरेदी करताना दिसत आहेत. देशाच्या अर्थमंत्र्यांना भाजी मंडईत पाहून लोकांनाही आश्चर्य वाटले. बाजारात उपस्थित असलेले लोक अर्थमंत्र्यांचा व्हिडिओ काढतानाही दिसत आहेत. अर्थमंत्र्यांच्या भाजी खरेदी करतानाच्या व्हिडिओवर लोकांनी कमेंटही केल्या आहेत. 



एक मिनिट 30 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये अर्थमंत्री वेगवेगळ्या दुकानदारांशी गप्पा मारताना आणि भाजी खरेदी करताना दिसत आहेत. अर्थमंत्र्यांसोबत अन्य काही लोकही दिसत आहेत. देशात सातत्याने  महागाई वाढत असताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भाजी मार्केटला भेट दिली आहे. दरम्यानस देशात खाद्यपदार्थांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.


केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितले होते की, भारत इतर देशांच्या तुलनेत मजबूत स्थितीत आहे. चालू आर्थिक वर्षात जीडीपी वाढ दुहेरी अंकांमध्ये राहण्याची अपेक्षा आहे. सीतारामन यांनी जीडीपी वाढीबाबत दृष्टिकोन सकारात्मक असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी त्या अहवालांचाही संदर्भ दिला ज्यामध्ये देशात मंदीचा धोका नसल्याचे म्हटले होते.