नवी दिल्ली: केंद्रीय मंत्री पीयूष गोयल थोड्याच वेळात लोकसभेत बजेट सादर करणार आहेत. निवडणुकीच्या आधी हे बजेट सादर होत असल्याने या बजेटमध्ये अनेक मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) इतर सहकाऱ्यांसोबत बजेट बॅग घेऊन राष्ट्रपती भवन येथे पोहोचले. येथे त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे बजेट सादर करण्याची परवानगी मागितली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ज्यूस देत या सगळ्यांचं स्वागत केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


राष्ट्रपतींच्या भेटीआधी 10 वाजता कॅबिनेटची बैठक झाली. 11 वाजता अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. बजेटच्या प्रती कडेकोट सुरक्षेत संसदेत दाखल झाले.



शिव प्रताप शुक्ल यांनी यावेळी विंध्यवासिनी देवीचं दर्शन घेतलं. लोकसभेमध्ये बजेट सादर होण्याआधी त्यांनी देवीचं दर्शन घेतलं. शिव प्रताप शुक्ल हे पूर्वांचलमधून आहेत. येथे विंध्याचल देवीच्या प्रती लोकांच्या मनात आस्था आहे.