मुंबई :  जुलै महिना हा आर्थिक कामांसाठी खूप महत्त्वाचा महिना आहे. आज 31 जुलै म्हणजे या महिन्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे तुम्ही आर्थिक कामं आजच करुन घ्या अन्यथा तुम्ही अचडणीत पडू शकतात. नाही तर तुम्हाला आर्थिक फटका बसेल. त्यामुळे आताच लागा कामाला आणि आपली राहिलेली कामं पूर्ण करुन घ्या. आज तुम्हाला कुठलीही कामं करायची आहेत त्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 


1. आयकर रिटर्न भरणे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर तुम्ही अजून ITR Filing Deadline म्हणजे आयटी रिटर्न अजून दाखल केला नसेल, तर त्वरित हे काम करा. कारण आयटी रिटर्न दाखल करण्याची आजची शेवटची तारीख आहे. जर तुम्ही आयटी रिर्टन भरलं नाही तर तुम्हाला दंड भरावा लागेल. जर तुम्हाला दंड भरायचा नसेल तर आर्थिक वर्ष 2021-2022 किंवा मूल्यांकन वर्ष 2022-2023 साठी ITR दाखल करा. जर तुमचं उत्पन्न 5 लाख रुपयांपर्यंत किंवा त्यापेक्षा कमी असल्यास, तर त्यांना 1,000 रुपये दंड भरावा लागेल. तर ज्यांचे उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल त्यांना 5000 रुपये दंड भरावा लागेल. 


2. पीएम किसान सन्मान निधी योजना E-KYC


शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. कारण पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनी जर E-KYC केलं नसेल तर ते अडचणीत सापडू शकतात. कारण आज E-KYCची अंतिम तारीख आहे. जे शेतकरी E-KYCची प्रक्रिया पूर्ण करणार नाही, त्यांना पुढील हप्ताचे पैसे मिळणार नाहीत. शेतकरी घरी बसूनही ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात. पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटद्वारे तुम्ही E-KYC ऑनलाइन पूर्ण करु शकता. त्यामुळे शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे की, त्यांनी आजच्या आज E-KYC प्रक्रिया पूर्ण करावी. 



3. पीक विमा (PMFBY)


तर शेतकऱ्यांची दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ते प्रधानमंत्री फसल विमा योजना. जर शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचा विमा काढून आर्थिक संकट टाळ्याचं असेल तर त्यांनी त्वरित PMFBY मध्ये नोंदणी करा. ही नोंदणी करण्याची आजची शेवटची तारीख आहे. ही नोंदणी तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन देखील करु शकता. या नोंदणी तुमच्या जवळील बँक शाखा, सहकारी बँक लिमिटेड, सार्वजनिक सेवा केंद्र, अधिकृत विमा कंपनीत करता येते. तर http://pmfby.gov.in वर तुम्ही ऑनलाइन नोंदणी करु शकता. 



4. रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक


उत्तराखंडातील लोकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. कारण जर तुम्ही रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची शेवटची दिवस आहे. तुम्हाला जर सरकारच्या तीन मोफत सिंलेडरचा लाभ घ्यायचा असेल तर त्वरित रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करा. 



5. इलेक्ट्रिक वाहनांवर सबसिडी मिळवण्याची शेवटची संधी


इलेक्ट्रिक वाहनांवर सबसिडी मिळवण्याची आज शेवटची संधी आहे. मात्र ही योजना गोव्यात राहणाऱ्या रहिवासीसाठी आहे. गोवा राज्य सरकारद्वारे इलेक्ट्रिक वाहनांवर सबसिडी देण्यात येते. जे लोक इलेक्ट्रिक वाहन घेतात त्यांना खरेदीवर 3 लाख रुपयांपर्यंत सबसिडी देण्यात येते. तर गोवा राज्य सरकार टू-व्हिलर, थ्री व्हिलर आणि कारवरही सबसिडी देते. अनुक्रमे टू-व्हिलरवर 30,000 रुपये,  थ्री व्हिलरवर 60,000 रुपये आणि कारवर 3 लाख रुपयांपर्यंत सबसिडी देण्यात येते.