मुंबई : Market Timings Latest News: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)च्या अधिसुचनेनुसार, 18 एप्रिलपासून सकाळी 10 ऐवजी सकाळी 9 वाजता व्यापार सुरू होईल. आरबीआयने सोमवारी (11 एप्रिल) सांगितले की, कोविड प्रतिबंधक नियम हटवण्यात आल्याने सकाळी 9 वाजल्यापासून वित्तीय बाजारात (financial markets) व्यापार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

(https://www.rbi.org.in/Scripts/BS_PressReleaseDisplay.aspx?prid=53553)


बाजारातील ट्रेडिंग वेळेबाबत नवीन अपडेट आले आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने वित्तीय बाजारपेठेतील व्यापाराचे तास बदलले आहेत. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, सोमवार, 18 एप्रिलपासून बाजाराचे नवीन वेळापत्रक लागू होणार आहे. आतापर्यंत कामकाजाची वेळ सकाळी 10 वाजेपासून होती. मात्र आता 18 एप्रिलला म्हणजेच उद्यापासून कामकाज 9 वाजल्यापासून सुरू होऊन दुपारी 3.30 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.


आरबीआयची दिली माहिती 
आरबीआयने म्हटले आहे की, 'कोविड निर्बंध हटवण्यात आल्याने आणि कार्यालयातील कामकाज सामान्य झाल्यामुळे, 9 पासून वित्तीय बाजारात व्यापार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता नियमन केलेल्या आर्थिक बाजारांसाठी, त्यांची सकाळी 9:00 पासून असणार आहे.


बाजारात व्यापाराचे तास
परकीय चलन बाजार आणि सरकारी रोख्यांमधील व्यवहार आता बदललेल्या वेळेनुसार शक्य होणार असल्याचेही आरबीआयने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. 


18 एप्रिल 2022 पासून, रिझर्व्ह बँकेच्या नियमन करीत असलेल्या बाजारात जसे की फॉरेक्स डेरिव्हेटिव्ह, रुपयाचे व्याज दर डेरिव्हेटिव्ह, कॉर्पोरेट बाँड्समधील रेपो, फॉरेन एक्स्चेंज (FCY)/ भारतीय रुपया (INR) ट्रेडसाठी सकाळी 10 ऐवजी 9 वाजता सुरू होईल.


जुनी प्रणाली पुन्हा लागू 
विशेष म्हणजे 2020 मधील कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर RBI ने 7 एप्रिल रोजी बाजाराच्या व्यापाराचे तास बदलले होते. बाजाराच्या वेळा सकाळी 10 ते दुपारी 3.30 पर्यंत बदलण्यात आल्या, त्यामुळे व्यापाराचे तास अर्ध्या तासाने कमी करण्यात आले. पण आता परिस्थिती सामान्य होत आहे, त्यानंतर आता आरबीआय जुने वेळापत्रक पुन्हा लागू करत आहे.