नवी दिल्ली : भ्रष्टाचारमुक्त भारत, काळा पैसा भारतात आणणार अशा अनेक आश्वसनांवर मोदी सरकार सत्तेत आले.   कामात पारदर्शकता आणण्याचा  सरकारचा प्रयत्न सुरु आहे. पण मोदींच्या नावे भ्रष्टाचार करणाऱ्या भामट्यास पोलिसांनी अटक केली आहे.  नवी दिल्लीतील फरीदाबाद येथे हा प्रकार समोर आला आहे. 
 पंतप्रधान नरेंद्र नावाशी जगभरात मोठे वलय निर्माण झाले आहे. त्यांचे भारताविषयीचे धोरण , योजना ते वेळोवेळी मांडत असतात. याचाच फायदा घेऊन लोकांची फसवणूक केली जात होती. मोदींच्या नावाने रहिवाशी संस्था सुरू करून शेकडो लोकांकडून देणग्या उकळल्याच्या तक्रारी पोलिसांकडे येऊ लागल्या होत्या. त्यावरुन माग काढत सीबीआयने या भामट्याला अटक केली आहे.  संस्थेच्या सेक्रेटरीविरुद्ध गुन्हेगारी कट व फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जे.पी.सिंह असं या भामट्याचं नाव आहे. 
 
 मोदींच्या वाढत्या लोकप्रियतेचा गैरफायदा घेण्याचे जे.पी.सिंहचे काम गेली अनेक महिने सुरु होते.  त्याने जफरीदाबाग येथे नरेंद्र मोदी विचार मंच नावाची नोंदणीकृत रहिवाशी संस्था सुरू केली. मोदीचे या संस्थेशी जवळचे संबध असल्याचे त्याने लोकांना भासविले. ही संस्था जणू राष्ट्रहिताचेच काम करत आहे असे लोकांच्या मनात बिंबविण्याचा त्याने प्रयत्न केला. पण तो प्रयत्न जास्त काळ टिकू शकला नाही.  त्याने संस्थेच्या www.nmvmindia.org या वेबसाईटवर स्वत:चा व मोदी यांचा फोटो लावला. या संस्थेतर्फे अनेक योजना राबवल्या जातात अशी प्रसिध्दी त्याने केली होती. याकडे अनेक लोक आकर्षली जात होती.  तसेच त्याने केलेल्या आर्थिक मदतीच्या आवाहनालाही जनतेतर्फे प्रतिसाद मिळत होता. मोदींशी संबंधित संस्था असल्याने अनेकांनी सढळ हाताने संस्थेला देणग्याही दिल्या. काही देणगीदारांना यावर संशय आला. तसेच तपासातही हे बोगस प्रकरण सुरु असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सीबीआयने नरेंद्र मोदी विचार मंच या संस्थेशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले.