बिहार : बिहारमधील मधुबनी रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या एका रिकाम्या ट्रेनला भीषण आग लागली. या भीषण आगीत ट्रेनच्या 5 बोगींना जळून खाक झाल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेल्वेला लागलेल्या आगीच्या ज्वाळा दूरवर दिसत आहेत. आगीमुळे आकाशात सर्वत्र धुराचे लोट दिसत असून या घटनेमुळे स्थानकात एकच गोंधळ उडाला. सुदैवाने या आगीत कोणतीही दुर्घटना घडलेली नाही.


या आगीचा व्हिडिओ समोर आला असून यात ही आग किती भीषण होती हे दिसून येते. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत.