नवी दिल्ली : जिथे रुग्णांचे उपचार सुरू होते जिथे जगण्याची आशा होती तिच आशा आगीत होरपळली. एका खासगी रुग्णालयात भीषण अग्नितांडव झाला. आगीची माहिती मिळताच तातडीनं 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे. आगीचं कारण अद्याप समोर आलं नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य प्रदेशातील जबलपूरमधील दमोह नाका परिसरात असलेल्या न्यू लाइफ मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाला भीषण आग लागली. या आगीत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. 


आगीमुळे रुग्णालयात गोंधळाचे वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तळमजल्यावर शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं सांगितलं जात आहे.  या आगीत दोन जण गंभीर जखमी आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 


#WATCH | Madhya Pradesh: Fire breaks out at Jabalpur Hospital. Further details awaited pic.twitter.com/RdjjqARKIY




मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपये मदत मध्य प्रदेश सरकारकडून देण्यात येणार असल्याचं तिथल्या सरकारनं जाहीर केलं आहे. या आगीतील मृतांचा आकडा वाढण्यीची भीती व्यक्त केली जात आहे.