स्पा सेंटरला आग, होरपळून महिला व्यवस्थापकासह दोघांचा मृत्यू
Spa Center Fire : धक्कादायक घटना. स्पा सेंटरला आग लागून महिला व्यवस्थापकासह दोघांचा मृत्यू झाला आहे.
नोएडा : Spa Center Fire : धक्कादायक घटना. स्पा सेंटरला आग लागून महिला व्यवस्थापकासह दोघांचा मृत्यू झाला आहे. दिल्ली जवळील नोएडातील सेक्टर 24 पोलीस स्टेशन हद्दीतील गिझोड गावातील एका कॉम्प्लेक्समध्ये सुरू असलेल्या स्पा सेंटरमध्ये गुरुवारी संध्याकाळी भीषण आग लागली. या अपघातात स्पा सेंटरच्या व्यवस्थापकासह दोघांचा होरपळून मृत्यू झाला. आगीचे कारण शॉर्टसर्किट असल्याचे सांगितले जात आहे.
आगीच्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती तात्काळ पोलीस आणि अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यानंतर घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. बचाव पथकाने आग आटोक्यात आणली. घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या गाड्यांनी अनेक तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिसांनी दोन्ही मृतांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले गेले आहेत. अहवाल नोंदवल्यानंतर अपघाताचा तपास सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
साफसफाई करताना शॉर्टसर्किटमुळे अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात येत आहे. डीसीपी रणविजय सिंह यांनी सांगितले की, गिझोड गावातील आशीर्वाद कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या जकूझी स्पा सेंटरमध्ये गुरुवारी संध्याकाळी साफसफाई करताना शॉर्ट सर्किटमुळे मोठी आग लागली. दरम्यान, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. स्पा सेंटरच्या मॅनेजर राधा चौहान आणि सेक्टर-135 मध्ये राहणारा अंकुश आनंद या अपघातात भाजल्याचे त्यांनी सांगितले. सिंह यांच्या म्हणण्यानुसार, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि अनेक तासांच्या प्रयत्नानंतर त्यांना आग विझवण्यात यश आले.