Clinic Fire : छत्तीगडच्या (Chhattisgarh) धनबादमध्ये (Dhanbad) एका रुग्णालयाला आग लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आहे. या आगीत (Fire) सहा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये डॉक्टर दाम्पत्याचाही समावेश आहे. शुक्रवारी मध्यरात्री ही भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. शॉर्ट सर्किटमुळे (Short circuit) ही आग लागल्याचे म्हटले जात आहे. दुसऱ्या मजल्यावर हे शॉक सर्किट झाले होते. मात्र काही वेळात संपूर्ण इमारतीला आगीने घेरलं आणि यामध्ये सहा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धनबादच्या पुराना बाजार एक्सचेंज रोडवरील आरसी हाजरा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये ही आग लागली. या आगीत डॉ.सी.सी.हजरा यांचा मुलगा डॉ.विकास हाजरा, त्यांची पत्नी प्रेमा हाजरा, डॉ.विकास हाजरा यांचा पुतण्या सोहम खुमारू यांच्यासह सहा जणांचा गुदमरून मृत्यू झाला. रात्री उशिरा 2.15 च्या सुमारास ही दुर्दैव घडली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र अरुंद रस्ता असल्यामुळे अग्निशमशन विभागाच्या गाड्यांना पोहोचण्यात मोठी अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे आग मोठ्या प्रमाणावर पसरली.


डॉ. विकास हाजरा हे त्यांच्या कुटुंबियांसोबत हॉस्पिटलच्या शेजारीच बांधलेल्या नवीन इमारतीत राहत होते. दोन्ही इमारतींमधील स्टोअर रूममध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आग लागल्यानंतर काही तासांनी आग आटोक्यात आणता आली. मात्र नेमकी आग कशामुळे लागली याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. घटनास्थळावरुन 9 जणांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले. सगळ्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


...तर आणखी लोकांचा गेला असता जीव


हॉस्पिटलमध्ये आग लागली तेव्हा भरलेले गॅस सिलिंडर स्वयंपाकघरात ठेवण्यात आले होते. अपघातावेळी सिलिंडर काळजीपूर्वक बाहेर काढण्यात आले. नाहीतर आगीची आणखी भडका झाला असता. ,


हॉस्पिटलवर गंभीर आरोप


दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी रुग्णालय व्यवस्थापनावर गंभीर आरोप केले आहेत. रुग्णालयात आग लागल्यास बचावासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याचे अग्निशमन विभागाने सांगितले. हॉस्पिटलमध्ये अग्निरोधक यंत्रही कार्यान्वित नव्हते. हॉस्पिटलला लागूनच एक बहुमजली इमारत आहे. या इमारतीत घरे आहेत. इमारतीला आग लागली असती तर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकली असती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.