नवी दिल्ली : देशातील सर्वात सुरक्षीत मानल्या जाणा-या पंतप्रधान कार्यालयाला मंगळवारी आग लागली. एएनआयनुसार, ही आग सकाळी ३ वाजून ३५ मिनिटांनी लागली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, पीएमओमध्ये दुस-या मजल्यावर असलेल्या रूम नंबर २४२ ला ही आग लागली. 



एसपीजी इन्स्पेक्टरने दिल्ली फायर सर्व्हिसला या आगीची माहिती दिली. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. तब्बल एका तासानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. 



प्राथमिक माहितीनुसार, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे सांगितले जात आहे. या आगीत कुणीही जखमी झाल्याची माहिती नाही. आगीत झालेल्या नुकसानाचा अंदाज अजून लावण्यात आलेला नाहीये. या खोलीतील अनेक महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाल्याचा अंदाज आहे.