पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळ आग
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाजवळ आग लागली आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाजवळ आग लागली आहे. ७ लोककल्याण मार्गावरच्या पंतप्रधान निवासस्थानी संध्याकाळी ७.२५ वाजता ही घटना घडली. आग लागल्यानंतर लगेचच अग्निशमन दलाच्या ९ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. पंतप्रधानांच्या निवासस्थाना जवळ लागलेली ही आग आता आटोक्यात आली आहे. आगीच्या या घटनेबाबत पंतप्रधान कार्यालयाने ट्विट करुन माहिती दिली आहे. ९ लोक कल्याण मार्गावर लागलेली ही आग छोटी होती. तसंच शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली. ही आग पंतप्रधानांच्या निवासस्थानी किंवा कार्यलयात लागली नसून एलकेएम कॉम्प्लेक्सच्या एसपीजी रिसेप्शन भागामध्ये ही आग लागली.