Fire In Narela Factory: दिल्लीतील नरेला परिसरात आगीची मोठी दुर्घटना घडली आहे. येथे एका प्लास्टिक कारखान्याला भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि बचावकार्य सुरु केले. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. इमारतीच्या काचा फोडून काही लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. या अपघातात आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू झाला असून 2-3 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.


अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, नरेला इंडस्ट्रियल परिसरातील एका प्लास्टिक कारखान्यात आग लागली. अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आतापर्यंत तीन जणांना वाचवण्यात यश आले असून काही लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मदतकार्य सुरुच आहे.


नरेलामध्ये बचावकार्य  


नरेला येथील कारखान्यात कामगार काम करत असताना ही आग लागली. इमारतीत 2-3 लोक अडकले असण्याची भीती आहे. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, आगीची घटना नरेला औद्योगिक परिसरात घडली. काही लोक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. त्याला किरकोळ दुखापत झाली आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून, त्यांची ओळख पटवली जात आहे.


पुण्यातही आग


विशेष म्हणजे आज (मंगळवारी) महाराष्ट्रातील पुण्यातील एका हॉटेलला भीषण आग लागली. (Pune Fire ) आगीच्या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही ही दिलासादायक बाब आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू केले.