नवी दिल्ली : दिल्लीतील अक्षरधाम मंदिरजवळ गोळीबार करण्यात आलाय. पोलीस आणि काही अज्ञातांमध्ये हा गोळीबार झालाय. एका पांढरा रंगाच्या कारमधून चार अज्ञातांनी मंदिराजवळ पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांवर गोळीबार केल्यानंतर पोलिसांना चकवा देत गोळीबार करणारे गीता कालोनीकडे पळून गेले. गोळीबार करणाऱ्या व्यक्तिंचा पोलीस तपास करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


हे अज्ञात पांढऱ्या कारमधून आले होते. पोलिसांवर फायरिंग केल्यानंतर ते घटनास्थळावरून फरार झाले. पोलिसांच्या प्रतिहल्ल्यापासून वाचण्यासाठी ते गीता कॉलनीच्या दिशेने पळाले. पोलीस अज्ञातांचा शोध घेत आहेत.