श्रीनगर : जम्मू-काश्मीरधील अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग भागात दहशतवादी आणि सुरक्षादल यांच्यात चकमक सुरू आहे. दोन्हीकडून गोळीबार सुरू आहे. सुरक्षादलाकडून या संपूर्ण भागाला घेराव घालण्यात आला असून सुरक्षारक्षकांकडून शोधमोहिम सुरू करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा अनंतनागमध्ये दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरू करण्यात आला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या भागात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळताच राष्ट्रीय रायफल्स, विशेष अभियान समूह, जम्मू-काश्मीर पोलीस आणि केंद्रीय रिजर्व पोलीस दलाच्या जवानांनी कोकरनाग भागात शोधमोहिम सुरू केली. सुरक्षादलाकडून शनिवारी सकाळपासून शोपियां जिल्ह्यातील दोन गावांत घेराबंदी आणि सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.



याआधी शुक्रवारी सकाळी बडगाम जिल्ह्यातील परगाम भागात सुरक्षादलाकडून जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या दहशतवाद्यांकडून एम-४ अमेरिकी रायफल जप्त करण्यात आले. गेल्या एका आठवड्यात ६ हून अधिक चकमकीच्या घटनांमध्ये १२ दहशतवादी मारण्यात आले. खात्मा करण्यात आलेले दहशतवादी अधिकतर जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी जोडले गेले असल्याची माहिती मिळत आहे.