सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; भाजपच्या २ आमदारांसह तिघांची नावे
पोलिसांनी प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्यासाठी शोध सुरू केला आहे.
सिलचर: एका सेक्स रॅकेट प्रकरणात ३ आमदारांचा समावेश असल्याचे धक्कादायक वृत्त पुढे आले आहे. एकूण तिंघांपैकी २ आमदार भाजपचे आहेत. तर, तिसरा आमदार AIUDF पक्षाचा आहे. पोलीस एफआयआरमध्ये ज्या तीन आमदारांचा समावेश आहे. त्यात भाजपचे आमदार अमिनुल हक लस्कर आणि किशोर नाथ आणि AIUDF च्या निजाम उद्दीन चौधरी यांच्या नावाचा समावेश आहे. पोलिसांनी प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्यासाठी शोध सुरू केला आहे. हे प्रकरण असम राज्यातील आहे.
..अन मग झाला प्रकरणाचा भांडाफोड
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, या रॅकेटमध्ये अडकलेल्या व स्वत:ची सुटका करून घेत पळालेल्या महिलांनी पोलिसांत प्राथमिक तक्रार दाखल केली. त्यानंतर या रॅकेटबाबत भांडाफोड झाला. महिलांनी दिलेल्या तक्रारीत या तिन्ही आमदारांची नावे आहेत. महिलांनी आरोप केला आहे की, त्यांना घेऊन महरपुर येथील पुष्प विहार लेनमधल्या एका घरातून सेक्स रॅकेट चालविण्यात येत होते. गुरूवारी रात्री पोलिसांनी आणखी एका महिलेला ताब्यात घेतले आहे. या महिलेवर सेक्स रॅकेट चालवल्याचा आरोप आहे.
आमदार आरोपी नव्हे, ग्राहक
दरम्यान, या प्रकरणात आणखी दोन व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कचरचे एसपी राकेश रोशन यांनी सांगितले की, अटक केलेल्या तिघांनाही न्यायालयासमोर शुक्रवारी हजर करण्यात आले. या वेळी या प्रकरणात आणखी दोन बडे आरोपी असल्याचे सांगण्यात आले होते. दरम्यान, या प्रकरणात तिन आमदारांचीही नावे आली आहेत. मात्र, त्यांना आरोपींच्या ऐवजी कस्टमर असे म्हटले आहे. एसपीने म्हटले आहे की, आम्ही हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून, तपास सुरू केला आहे. तसेच, या प्रकरणात कायदेशीर कारवाई गांभीर्याने केली जाईल.
छे छे! विश्वास कोण ठेवणार?
दरम्यान, आपल्यावरील आरोप फेटाळून लावलत आमदार अमिनुल हक लस्कर यांनी म्हटले आहे की, ८ डिसेंबर २००६मध्ये टोनी मुजूमदारकडून मला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तो त्या महिलेचा जावई आहे. सेक्स रॅकेट चालवत असल्याचा त्याच्यावर आरोप आहे, असे सांगतानाच ज्या व्यक्तिने मला मारण्याचा प्रयत्न केला. त्याच्या घरी जाण्याचा मी प्रयत्न करेन यावर कोणीतरी विश्वास ठेवेल काय? असा प्रतिप्रश्न लस्कर यांनी केला आहे.
'मी तर धार्मीक माणूस, मला बदनाम करण्यासाठीच हा डाव'
या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्यासाठी आमदारांनी एका उच्चस्तरीय समिती नेमण्यात यावी अशी मागणी केली आहे. दरम्यान, दुसरे आमदार चौधरी यांनी म्हटले आह की, मी हाजी आहे आणि एक धार्मिक व्यक्तिही आहे. कोणीच विश्वास ठेवणार नाही की, मी अशा कृत्यात सहभागी आहे. त्यांनी आरोप केला आहे की, सेक्स रॅकेट प्रकरणात नाव येण्यामागे त्यांच्याच पक्षाचा कार्यकर्ता असलेल्या अफताब उद्दीन यांचा हात आहे.