नवी दिल्ली : मोदी सरकारच्या तातडीनं अमंलबजावणीमुळे अवघ्या चार वर्षात 'चिनूक' हे हेलिकॉप्टर भारतात दाखल झाली आहेत. या हेलिकॉप्टर्समुळे भारतीय वायुदल अधिक शक्तिशाली झालं आहे. अमेरिकेतून खरेदी केलेली चार चिनूक हेलिकॉप्टर भारतीय वायुदलामध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. गुजरातमधील कच्छ मुंद्रा विमानतळावर चार हेलिकॉप्टर पोहचली आहेत. 


चिनूक हेलिकॉप्टर्स

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतानं २०१५ मध्ये अमेरिकी विमान कंपनी बोईंगकडून १५ 'चिनूक' हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा व्यवहार केला होता. २.५ अरब डॉलरच्या या व्यवहारात २२ 'अपाचे' हेलिकॉप्टरचाही समावेश आहे. या वर्षाच्या अखेरीस भारतात 'चिनूक' आणि 'अपाचे' सर्व हेलिकॉप्टर्स पोहचली जातील. या हेलिकॉप्टर्समुळे भारतीय वायुदल अधिक ताकदवान होणार आहे.


'चिनूक' हेलिकॉप्टरमध्ये अधिकाधिक उंचीवर उड्डाण घेण्याची क्षमता आहे तर 'अपाचे' जगातील सर्वोत्तम लढाऊ हेलिकॉप्टर असल्याचं मानलं जातं. अमेरिकेचं लष्कर बऱ्याच काळापासून अपाचे आणि 'चिनूक' हेलिकॉप्टरचा वापर करत आहे.