बंगळुरु : कर्नाटकमध्ये कुमारस्वामी यांच्या सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. बुधवारी सकाळी आमदार मंत्रीपदाची शपथ घेतील. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात जेडीएसचे 9 आमदार मंत्रीपदाची शपथ घेतील. 2-3 आमदारांना नंतर शपथ दिली जाणार आहे. पण काँग्रेसचे किती आमदार मंत्रीपदाची शपथ घेतील याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक जूनला झालेल्या सहमतीमध्ये काँग्रेसचे 22 आणि जेडीएसचे 12 आमदार मंत्री होतील. काँग्रेसच्या खात्यात गृह, सिंचन, आरोग्य, कृषी आणि महिला बाल कल्याण विभाग तर जेडीएसकडे अर्थ, लोक निर्माण विभाग, शिक्षा, पर्यटन आणि परिवहन विभाग असणार आहेत.


काँग्रेस नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री जी परमेश्वर यांनी म्हटलं की, कर्नाटकमध्ये बुधवारी दोन वाजता एचडी कुमारस्वामी यांच्या कॅबिनेटचा विस्तार होणार आहे. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी मंत्रिमंडळात मंत्रीपदावरुन मतभेद असल्याची गोष्ट फेटाळून लावली आहे.