मुंबई : देश येत्या 26 जानेवारी रोजी 73 वा प्रजासत्ताक दिवस साजरा करणार आहे. दर वर्षी राजपथावर प्रजासत्ताक दिवसानिमित्त परेड होत असते. यावर्षी ही परेड 30 मिनिटे उशीरा सुरू होणार आहे. परेडची वेळ निश्चित असते. त्यानुसारच संपूर्ण कार्यक्रम आयोजित केला जातो. यावेळी एका विशेष कामामुळे परेडला उशीर होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उशीर होण्यामागचे कारण
यावर्षी कोरोना प्रोटोकॉल आणि श्रद्धांजली सभेच्या आयोजनमुळे प्रजासत्ताक दिवसांची परेड 30 मिनिटे उशीरा सुरू होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार आधी जम्मू-काश्मीरमध्ये हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली दिली जाणार आहे. त्यानंतर परेड सुरू होईल. प्रजासत्ताक दिवसाची परेड 90 मिनिटांची असते. दर वर्षी 26 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता दिल्लीतील राजपथावर परेड सुरू होते.


8 किमीची असणार परेड
प्रजासत्ताक दिवसाची परेड 8 किलोमीटरची असणार आहे. परेड रायसीना हिलपासून सुरू होऊन राजपथ, इंडिया गेटमार्गे लाल किल्ल्याजवळ संपते.
परेडच्या सुरूवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, इंडिया गेटवर अमर जवान ज्योती आणि राष्ट्रीय युद्ध स्मारकाला अभिवादन करतील. 
कोविड 19 च्या संसर्गामुळे फक्त 4 हजार टिकिट उपलब्ध असतील. तसेच एकूण 24 हजार लोकांना कार्यक्रमात सहभागी होण्याची परवानगी दिली जाईल.


हायटेक सुरक्षाव्यवस्था
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्ली पोलीसांनी राजपथ आणि आजुबाजूच्या परिसरातील सुरक्षा वाढवली आहे. साधारण 300 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. चेहऱ्यांची ओळख करणारी यंत्रणा सज्ज आहे.