प्रज्ञान रोव्हरने थेट शिवशक्ती पाईंटवरुन पाठवला पहिला व्हिडिओ; चंद्रावरील अनेक रहस्य उलगडणार
चंद्रावर गेलेल्या प्रज्ञान रोव्हरनं रेकॉर्ड केली चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील नवी दृष्य. इस्रोनं व्हिडीओ ट्विट केला आहे.
Chandrayaan - 3 : चांद्रयान-2 उतरलेल्या ठिकाणाला तिरंगा, तर चांद्रयान 3 उतरलेल्या जागेचं शिवशक्ती असं नामकरण करण्यात आले आहे. प्रज्ञान रोव्हर चंद्रावरील शिवशक्ती पाईंटवरुन पहिला व्हिडिओ पाठवला आहे. सध्या प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर फिरत आहे. प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर कोणत्या प्रकारची खनीजं आहेत. तसेच चंद्रावर पाण्याचा शोध घेणार आहे. प्रग्यान रोव्हरच्या संशोधनामुळे चंद्रावरील अनेक रहस्य उलगडणार आहेत.
विक्रम लँडरच्या सॉफ्ट लँडिंगनंतर प्रग्यान रोव्हर चंद्रावर उतरला
विक्रम लँडरच्या सॉफ्ट लँडिंगनंतर प्रज्ञान रोव्हर चंद्रावर उतरला आहे. लँडर चंद्रावर उतरल्यानंतर 2 तास 26 मिनिटातच प्रग्यान रोव्हर त्यातून बाहेर पडला. प्रग्यान रोव्हरच्या या मून वॉकची दृश्य इस्रोनं जाहीर केली आहेत. प्रज्ञान रोव्हनं आपलं काम सुरु केलं असून चंद्रावरील खनीजं, पाणी, याचा शोध तो घेणार आहे.
23 ऑगस्ट राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा करणार
14 जुलै 2023 रोजी भाराताचे चांद्रयान 3 अवकाशात चंद्राच्या दिशेने झेपावले. 23 ऑगस्ट रोजी चांद्रयान 3 च्या विक्रम लँडरने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केले. संपूर्ण भारतीयांसाठी हा अभिमानाचा क्षण होता. 23 ऑगस्ट राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा करणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. चंद्रावर गेलेल्या प्रज्ञान रोव्हरनं नवा व्हिडिओ पाठवलाय. इस्रोनं हा नवा व्हिडिओ ट्विट केलाय. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर प्रज्ञान रोव्हर फिरतोय. त्यानं पाठवलेला हा नवा व्हिडिओ आहे.
पंतप्रधान मोदींनी केले इस्रोच्या सर्व शास्त्रज्ञांचं कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ग्रीस दौ-यातून भारतात लँड होताच बंगळुरुत इस्रो मुख्यालयाला भेट दिली. चांद्रयान-3 मोहीमेच्या यशाबद्दल त्यांनी इस्रोच्या सर्व शास्त्रज्ञांचं कौतुक केलं. तुमच्या कार्याला नमन करतो असे उद्गार काढताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले.यावेळी पंतप्रधान मोदींनी 3 महत्त्वाच्या घोषणा केल्या. चांद्रयान-3 चं विक्रम लँडर चंद्रावर ज्याठिकाणी उतरलं त्या ठिकाणाला यापुढे शिवशक्ती पॉईंट नावानं ओळखलं जाईलअशी घोषणा मोदींनी केली. तसंच चांद्रयाना-2 चं पदचिन्ह ज्याठिकाणी उमटलेत त्याठिकाणाचं तिरंगा पॉईंट असं नामकरण मोदींनी केले. इतकंच नाही तर ज्यादिवशी चांद्रयान-3 चंद्रावर उतरलं तो दिवस म्हणजे 23 ऑगस्ट यापुढे राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा करण्यात येईल अशी घोषणाही मोदींनी केली.