लग्नात पोहोचली पहिली पत्नी; पुढे नवरदेवासोबत जे घडलं ते धक्कादायक : VIDEO
पतीच्या दुसऱ्या लग्नात पहिल्या पत्नीची हजेरी
मुंबई : पती-पत्नीचं नातं एक अतुट नातं असतं. या दोघांमधील विश्वास, प्रेम हेच यशस्वी आणि आनंदी, सुखी संसाराचं गुपीत असतं. पण एक संसार मोडताना आपण पुढील व्हिडीओत पाहणार आहे. नवरदेव विवाहित असूनही दुसरं लग्न करत होता. त्याचवेळी त्याची पहिली पत्नी तेथे पोहोचली. (First Wife Suddenly came wedding Venue to stop second marriafe of his husband, Groom) त्यानंतर जो धक्कादायक प्रकार समोर घडला.
पहिली पत्नी आणि आठ वर्षांचा विसर पडलेला नवरदेव दुसरं लग्न करत होता. हे लग्न होत असतानाच पहिली पत्नी आपल्या कुटुंबासोबत आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांसोबत लग्नमंडपात आली. 2017 मध्ये आपल्याशी विवाह केल्याची धक्कादायक माहिती वधुच्या कुटुंबियांना सांगितली. एवढचं नव्हे तर हे लग्न वराच्या कुटुंबियांनी देखील माहित असल्याची माहिती उघड केली.
हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झालाय. यामध्ये वधुकडील एक व्यक्ती पहिल्या पत्नीला 'तुमची काय मागणी आहे?' असा प्रश्न विचारत आहे. यावर महिला या माणसाने माझं संपूर्ण आयुष्य खराब तर केलच. पण यासोबत त्याने आठ वर्षांच्या मुलाचं आयुष्य पूर्णपणे खराब झालं आहे.
महिलेसोबत आलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद केला. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.