लखनऊ : बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करण्याच्या बहाण्याने तब्बल अडीच लाख रुपये लुटल्याची घटना उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये घडलीये. पाच सरकारी कर्मचाऱ्यांसोबत ही घटना घडलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आधारशी लिंक करण्याबाबत या कर्मचाऱ्यांना फोन आले होते. यावेळी या कर्मचाऱ्यांनी आपल्या बँक खात्याचीही माहितीही दिली त्यानंतर यांच्या खात्यातून पैसे काढण्यात आले. 


या घटनेतील पीडित व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना एका व्यक्तीचा फोन आला. यावेळी त्या व्यक्तीने आपण स्वत: बँकेचे अधिकारी असल्याचे सांगत आधार लिंक न केल्यास तुमचे बँक अकाऊंट बंद होईल अशी धमकी दिली. त्यामुळे पीडित व्यक्तीने आपला आधार क्रमांक त्या व्यक्तीला दिला. त्यानंतर डेबिट कार्डचाही नंबरही मागितला.  त्यानंतर पीडित व्यक्तीच्या मोबाईल ओटीपी आला. हा ओटीपीही त्या व्यक्तीने फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीस दिला आणि त्यानंतर त्यांच्या खात्यातून दोन वेळा ८० हजार रुपये काढण्यात आले. 


अशीच काहीशी घटना दुसऱ्या कर्मचाऱ्यांसोबतही घडली. एका कर्मचाऱ्याच्या अकाऊंटमधून ६० रुपये काढण्यात आले. तर इतर तीन कर्मचाऱ्यांच्या अकाऊंटमधून २० हजार, ५० हजार आणि ४० हजार रुपये काढण्यात आले. याप्रकरणी सायबर सेलकडे तक्रार करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.